Pippa Release Date: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ईशान खट्टरचा (Ishaan Khattar) आज वाढदिवस आहे. ईशाननं त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. ईशाननं त्याच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट आज जाहीर केली आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.  'पिप्पा' हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर  रिलीज होणार आहे?  याबाबत जाणून घेऊयात...


कधी रिलीज होणार पिप्पा?


ईशानच्या 'पिप्पा' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. पिप्पा या चित्रपटात ईशान खट्टर हा कॅप्टन बलराम सिंह मेहता यांची भूमिका साकारत आहे. बलराम सिंह मेहता यांनी 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध लढले होते. पिप्पा चित्रपटाची कथा ही गरीबपूर येथे झालेल्या  युद्धावर आधारित आहेत, या लढाईनंतर बांगलादेशची निर्मिती झाली होती. 'पिप्पा'  हा चित्रपट 10 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपटट प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.


'पिप्पा' चित्रपटाची स्टार कास्ट


'पिप्पा' या चित्रपटात ईशानसोबतच मृणाल ठाकूर, प्रियांशू पैन्युली आणि सोनी राजदान हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ब्रिगेडियर बलराम सिंह मेहता यांच्या 'द मेकिंग चाफीज 'वर आधारित हा चित्रपट मेनन, तन्मय मोहन आणि रविंदर रंधावा यांनी लिहिला आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्गज ए.आर. रहमान यांनी दिला आहे.






चित्रपटाच्या नवाचा अर्थ काय?


'पिप्पा' या चित्रपटाचे नाव एम्फीबियस वॉर टँक पीटी-76  वरून ठेवण्यात आलं आहे, ज्याला "पिप्पा" म्हणतात, जे तुपाच्या रिकाम्या डब्या इतके सहजपणे पाण्यावर तरंगते.


काही दिवसांपूर्वी पिप्पा या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. या टीझरमध्ये 3 डिसेंबर 1971 रोजी देशातील सैनिक हे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं भाषण ऐकताना दिसत आहेत. या भाषणामध्ये इंदिरा गांधी या पाकिस्तानसोबत युद्धाची घोषणा करतात. 


पिप्पा हा चित्रपट 2 डिसेंबर  2022  रोजी रिलीज होणार होता पण नंतर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट 10 नोव्हेंबरला प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे.  


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Pippa Teaser: 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित 'पिप्पा' चा दमदार टीझर रिलीज; ईशान खट्टर अन् मृणाल ठाकूरची प्रमुख भूमिका