मुंबई : अर्जुन रामपालने घटस्फोटाचा निर्णय जाहीर केल्यानंतर आठवड्याभरातच तो एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सर्बियन अभिनेत्री नताशा स्टँकोविकसोबत अर्जुनचं अफेअर असल्याचं म्हटलं जात आहे.


अर्जुन रामपालची मुख्य भूमिका असलेल्या 'डॅडी' चित्रपटातील 'जिंदगी मेरी डान्स डान्स' गाण्यात नताशा झळकली होती. तेव्हापासूनच दोघं संपर्कात असून त्यांचं डेटिंग सुरु असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अर्जुन 45 वर्षांचा आहे, तर नताशा 26.

अर्जुन रामपालने मात्र इन्स्टाग्रामवरुन या सर्व चर्चा फोल असल्याचं म्हटलं आहे. 'काही दिवसांची सुरुवात ताज्या कॉफीने होते, तर काही दिवसांची लिंक अपच्या चर्चांनी. सध्या तरी फक्त मी आणि माझा कप आहोत.' अशी सूचक पोस्ट त्याने केली आहे.
20 वर्षांच्या संसारानंतर अभिनेता अर्जुन रामपाल विभक्त

अर्जुन आणि मेहर जेसिया यांनी 20 वर्षांच्या संसारानंतर परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जुन आणि मेहर यांनी 1998 मध्ये लगीनगाठ बांधली होती. त्यावेळी दोघंही जण मॉडेलिंग करत होते. त्यांना 16 वर्षांची महिका आणि 13 वर्षांची मायरा या दोन मुली आहेत.



अर्जुनने मॉडेलिंगनंतर 2001 मध्ये 'प्यार, इश्क और मोहब्बत' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर दीवानापन, आँखे, दिल है तुम्हारा, दिल का रिश्ता, ओम शांती ओम, रॉक ऑन, राजनीती यासारख्या अनेक चित्रपटात तो झळकला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या डॅडी सिनेमात त्याने साकारलेली 'डॉन अरुण गवळी' यांची भूमिका प्रचंड गाजली