गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेते शेखर सुमन सतत चर्चेत आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची हत्या झाल्याची पत्रकार परिषद घेणारे सुमम पहिले कलाकार होते. त्यानंतर सातत्याने गेल्या पाच महिन्यांपासून ते सुशांतच्या प्रकरणाचा पाठपुरावा करतायत. पण ते चालू असतानाच सुमन यांची एक आणखी चकित करणारी बाजू समोर आली आहे. त्याला कारण ठरली आहे इरफान यांची कबर.


प्रख्यात अभिनेते इरफान खान यांचं 29 एप्रिलला निधन झालं. गेल्या अनेक महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. पण त्यांची ती झुंज अपयशी ठरली. इरफान जाण्याची वेदना सर्वांनाच होती. अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग सर्वांनी तो शोक व्यक्त केला. कालांतराने सगळी मंडळी आपल्या कामाला लागली. पण एका फोटोने सुमन यांना हालवून टाकलं. तो फोटो होता इरफान यांचं दफन केलेल्या जागेचा. त्या जागेवर काही झांड लावून दगड लावण्यात आले होते. तर तिथेच इरफान यांच्या नावाची फरशी होती. त्यातल्या एका झाडाला इरफान यांचा मुलगा पाणी घालत होता. तो फोटो सुमन यांनी 30 सप्टेंबरला ट्विट केला.




कुली नंबर 1, छलांग, दुर्गावती येणार अ‍ॅमेझॉन प्राईमवर; सर्व चित्रपटांच्या तारखाही ठरल्या


इतक्या मोठ्या अभिनेत्याला इथे दफन केलं आहे, त्याला त्याची चांगली जागा नको का असा सवाल त्यांनी बोलून दाखवला होता. तर इथे एक कबर बांधली जावी आणि त्यावर संगमरवर असावा अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. पण केवळ इच्छा व्यक्त करून ते थांबले नाहीत. तर त्यांनी ही कबर बांधायला घेतली. कुठेही गाजावाजा न करता आता ही कबर बांधून पूर्ण झाली आहे. त्याचा फोटो सुमन यांनी शुक्रवारी ट्विट केला आहे. पांढरी शुभ्र अशी ही कबर असून त्यावर गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाबाची झाड लावण्यात आली आहेत.




इरफान खान हा भारताला लाभलेला चतुरस्र कलाकार होता. त्यांच्या अभिनयाने त्यांनी आपली कायमची छाप सोडली आहे. आजही त्यांचे चित्रपट आवडीने पाहिले जातात. यात उल्लेख करायला हवा तो लाईफ ऑफ पाय, मकबूल, पिकू, हिंदी मीडिअम अशा काही सिनेमांचा. अशा कलाकाराला तितकची देखणी जागा त्याच्या मृत्यू पश्चात मिळावी म्हणून सुमन यांनी हा मुद्दा लावून धरला होता.


Rhea Chakraborty gets bail | नियम मोडून रियाचा पाठलाग केल्यास कारवाई अटळ : पोलीस