Ira Khan Nupur Shikhare Wedding Reception : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) गेल्या काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नबंधनात अडकली आहे. उदयपूरमध्ये शाही थाटात लग्न केल्यानंतर मुंबईत त्यांच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. या रिसेप्शनची सर्वत्र चर्चा रंगली. या रिसेप्शनला आयराने परिधान केलेल्या लेहेंग्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 


आयरा खानचा लेहेंगा खास


वेडिंग रिसेप्शनला आयरा खानने परिधान केलेला लेहेंगा खूपच खास होता. लाल आणि सोनेरे रंगाच्या या लेहेंग्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. लेहेंग्यासह तिने कंटेंपरेरी ब्लाऊज आणि जॉर्जेटचा दुपट्टाही घेतला होता. फॅशन डिझायनर मोनाली रॉयने हा लेहेंगा डिझाईन केला होता. 


7 महिने अन् 300 तास लागलेत लेहेंगा बनवायला


न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत मोनालीने आयराच्या लेहेंग्याबद्दल भाष्य केलं आहे. मोनाली म्हणाली,"आयराचा लेहेंगा खास करण्यावर माझा भर होता. आयराच्या लेहेंग्यावर काम करताना नक्कीच मला मजा आली. लेहेंगा बनवण्यासाठी आयराने मला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळे अधिक चांगला लेहेंगा बनवण्यावर माझा भर होता. आयराला वेडिंग रिसेप्शनसाठी पारंपारिक लेहेंगा हवा होता. पण या लेहेंग्यावर तिला मॉर्डन टच असलेला ब्लाऊज हवा होता. तिचा हा लेहेंगा बनवायला मला 7 महिने 300 तासांपेक्षा अधिक वेळ लागला". 






लेहेंग्यात खास काय? 


आयराच्या लेहेंग्यावर प्योर रॉ सिल्कचं काम करण्यात आलं होतं. लाल रंगाच्या या लेहेंग्यावर सोनेरी रंगाच्या जरीचं काम करण्यात आलं होतं. पारंपारिक जरदोजी पद्धतीचा वापर करण्यात आला होता. लग्नसोहळ्यातील आयराने एकूण तीन लूक मोनालीने डिझाईन केले होते. 


आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शनला सेलिब्रिटींची मांदियाळी


आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या वेडिंग रिसेप्शनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात शाहरुख खान, सलमान खान, हेमा मालिनी, रेखा, सायरा बानो, माधुरी दीक्षित, जुही चावला, कतरिना कैफ, रणबीर कपूरसह अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता. आयरा-नुपूरवर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.


संबंधित बातम्या


Ira khan And nupur shikhare Reception: मुख्यमंत्री शिंदेंपासून ते ठाकरे कुटुंबीयांपर्यंंत; आमिरच्या लेकीच्या रिसेप्शनला या दिग्गजांनी लावली हजेरी