Shahrukh And Gauri Khan Love Story : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान आणि गौरी खान हे चर्चेत असणारे कपल आहेत.  25 ऑक्टोबर 1991 रोजी शाहरूख आणि गौरीचे लग्न झाले. सध्या शाहरूखचा मुलगा आर्यन खान   क्रूझ ड्रग्स प्रकरणी अटकेत   आहे. त्यामुळे शाहरूख आणि गौरी हे सध्या चर्चेत आहेत. शाहरूख आणि गौरीची लव्ह स्टोरी देखील हटके आहे. शाहरूख खानच्या जीवनावर आधारित असलेले पुस्तकात म्हणजेच  'किंग ऑफ बॉलीवुड: शाहरुख खान अॅंड द सेडक्टिव वर्ल्ड ऑफ इंडियन सिनेमा' मध्ये शाहरूख आणि गौरीच्या लव्ह स्टोरीचा उल्लेख केला आहे. 
 


शाहरूखच्या भावाने दिली होती बंदूक दाखवून धमकी 
शाहरूखच्या जीवनावर आधारित असलेल्या  'किंग ऑफ बॉलीवुड: शाहरुख खान अॅंड द सेडक्टिव वर्ल्ड ऑफ इंडियन सिनेमा' मध्ये चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांनी शाहरूख आणि गौरीच्या लव्ह स्टोरीबद्दल लिहीले आहे. त्यामध्ये असे लिहीले आहे की गौरीचे वडील रमेश चिब्बा हे शाहरूखच्या कामावर नाराज होते. तसेच गौरीच्या आईने देखील शाहरूख आणि गौरीच्या लग्नाला नकार दिला होता. गौरीचा भाऊ विक्रांतचा गौरी आणि शाहरूखच्या नात्याचा विरोध होता. शाहरूखला धमकी देण्यासाठी विक्रांत बंदूक घेऊन त्याच्याकडे गेला होता. पण शहरूख त्यावेळी घाबरा नाही.  


मुलाला जामीन न मिळाल्याने गौरी खानला अश्रू अनावर; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


असे भेटले गौरी आणि शाहरूख 
शहारूख आणि गौरीची ओळख दिल्लीमधील एका पार्टीमध्ये झाली. दोघांच्या कॉमन फ्रेंडच्या घरी ही पार्टी होती. त्यानंतर गौरी आणि शाहरूखच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. '


कॉफी विथ करण शोमध्ये गौरीला तिच्या धर्माबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने उत्तर दिले, 'शाहरूखचे आई वडिल आज जगात नाहित, पण  ते जर आज आमच्यासोबत असते तर आम्ही त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांची काळजी घेतली असती ते आमच्यासोबत नसल्याने आम्ही घरी दिवाळी, होळी असे सर्व सण साजरे करतो. त्यामुळे मुलांमध्ये  हिंदू धर्माचा इन्फ्यूएन्स जास्त आहे.


फोटोमधील 'या' अभिनेत्याला ओळखलं? 'सुपर मॉडेल'चा फोटोपाहून चाहते आश्चर्यचकित