KGF स्टारची कहाणी: कन्नड अभिनेता यश एका चित्रपटासाठी घेतो 15 कोटी; तरी वडील आजही चालवतात बस

यशचे (Yash) खरे नाव नवीन कुमार गौडा असून त्याचा जन्म कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे. यशचे वडील आजही कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळात बस चालक आहेत.

Continues below advertisement

वर्ष 2018 मध्ये रिलीज झालेला केजीएफ (KGF) चित्रपट तुम्हाला आठवतच असेल. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता यशने (Yash) आपल्या धमाकेदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मीडिया रिपोर्टनुसार, केजीएफचा पुढील सीझनही लवकरच रिलीज होणार आहे, तर मग जाणून घेऊया आज आपल्या चाहत्यांमध्ये 'रॉकी भाई' नावाने प्रसिद्ध अभिनेता यशशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी.

Continues below advertisement

यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे आणि त्याचा जन्म कर्नाटकातील हसन जिल्ह्यात मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. यशचे वडील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळात बस चालक आहेत. यशला लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये नायक व्हायचं होतं. यासाठी तो बंगळुरूला शिफ्ट झाला आणि इथेच राहून थिएटरचे बारकावे शिकत राहिला.


केजीएफच्या रिलीजनंतर यशची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे आणि तो कन्नड फिल्म इंडस्ट्रीचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला. तो प्रत्येक चित्रपटासाठी 15 कोटी रुपये घेत आहे. मुलगा कोट्यावधी पैसे कमवूनही, यशच्या वडिलांनी बस चालविण्याचा व्यवसाय सोडलेला नाही.

यशने मोठ्या पडद्यावर अस्तित्व निर्माण करण्यापूर्वी टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. यशने नंदा गोकुला नावाच्या टीव्ही सीरियलने ग्लॅमरच्या जगात पदार्पण केले आणि त्यानंतरच्या काळात त्याने कन्नड टीव्हीवरील बर्‍याच मालिकांमध्ये काम केले. यशला 2007 मध्ये कन्नड चित्रपट 'जम्बदा हुडुगी' या चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला. यशने केवळ अभिनयातच नाही तर गाण्यातही आपली उत्कृष्टता दाखविली आहे. यशने राधिका पंडितशी लग्न केले असून त्याला दोन मुले देखील आहेत.


मीडिया रिपोर्टनुसार यश केवळ चित्रपटांमध्येच नाही तर राजकारणातही सक्रिय आहे. यशने 2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एडीएस (एस) यांच्यासाठी प्रचार केला होता. यश आणि त्याची पत्नी देखील एक फाऊंडेशन चालवतात जे गरजूंना मदत करते, त्याचे नाव यशो मार्ग फाऊंडेशन आहे. (Yasho Marga Foundation). दरम्यान, यशच्या केजीएफ दोनची प्रेक्षक खूप वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच याचा एक ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola