Indian Police Force Teaser Out : 'इंडियन पोलीस फोर्स'ची (Indian Police Force) घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) या सीरिजचा टीझर आऊट झाला आहे. या टीझरमध्ये बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा (Sidharth  Malhotra)  वर्दीमध्ये अॅक्शन मोड पाहायला मिळाला आहे.


सिद्धार्थ मल्होत्राच्या 'इंडियन पोलीस फोर्स' सीरिजची चाहत्यांना उत्सुकता आहे. सीरिजमधील कलाकारांचे लूक आऊट झाल्यानंतर प्रेक्षक टीझरची प्रतीक्षा करत होते. आता टीझर आऊट झाला असून प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'इंडियन पोलीस फोर्स' या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


'इंडियन पोलीस फोर्स'च्या टीझरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहेत. देशाचं संरक्षण करताना सिद्धार्थ, शिल्पा आणि विवेक पाहायला मिळणार आहेत. एका शहरात बाँम्ब स्फोट होतो. या बाँम्ब स्फोटमध्ये अनेकांचा जीव जातो. बाँम्ब स्फोटानंतर दहशतवाद्यांचा बदला घेताना सिद्धार्थ दिसणार आहे.


सिद्धार्थने शेअर केला 'इंडियन पोलीस फोर्स'चा टीझर (Sidharth Malhotra Shared Indian Police Force Teaser)


अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने 'इंडियन पोलीस फोर्स'चा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"इंडियन पोलीस फोर्स' हा माझा पहिला अॅक्शनपट आहे. या सीरिजची मला उत्सुकता आहे. रोहित शेट्टीसोबत काम करताना मजा आली. ही सीरिज 19 जानेवारी 2023 रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात".






'इंडियन पोलीस फोर्स' ही सात भागांची सीरिज आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा पहिल्यांदाच कधी न साकारलेली पोलीसाची भूमिका साकारणार आहे. या सीरिजमध्ये शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय, श्वेता तिवारी, निकितिन धीर, ऋतुराज सिंह आणि ललित परिमू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सीरिजच्या माध्यमातून सिद्धार्थ ओटीटीवर पदार्पण करत आहे. 19 जानेवारी 2024 रोजी भारतासह जगभरातील 240 पेक्षा अधिक देशांमध्ये ही सीरिज रिलीज होणार आहे.


संबंधित बातम्या


Indian Police Force: सिद्धार्थ मल्होत्रासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; फोटो शेअर करत म्हणाला, "चेस सीननंतर..."