Oscar Awards Movies : 'ऑस्कर नामांकन 2023' (Oscar Nominations 2023) नुकतेच जाहीर झाले असून यात भारतातील दोन कलाकृतींनी बाजी मारली आहे. भारताच्या 'आरआरआर' (RRR) सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्करमध्ये ओरिजनल सॉंग्स या गटात नामांकन मिळालं आहे. तसेच 'ऑल दॅट ब्रीथ्स' या माहितीपटाला 'डॉक्युमेंटरी फीचर फिल्म' या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. यानिमित्ताने जाणून घ्या ऑस्करसाठी नामांकित झालेल्या भारतीय सिनेमांची यादी...


ऑस्करसाठी नामांकित झालेल्या भारतीय सिनेमांची यादी पुढीलप्रमाणे : (List of Indian movies nominated for Oscars)


मदर इंडिया (Mother India) 1957


'मदर इंडिया' या सिनेमात नर्गिस, सुनील दत्त, राजेंद्र कुमार, राज कपूर मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा भारतातर्फे ऑस्कर अॅकेडमी पुरस्काराच्या विदेशी भाषा विभागासाठी पाठवण्यात आला होता. 


द हाऊस दॅट अनंदा बिल्ट (The House That Ananda Built) 1968


फली बिलिमोरिया दिग्दर्शित 'द हाऊस दॅट आनंदा बिल्ट' हा सिनेमा नागपुरातील एका व्यापाऱ्याच्या आयुष्याभोवती फिरणारा आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. त्यावेळी हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 


एन एनकाउंटर विथ फेस (An Encounter With Faces)1978


'एन एनकाउंटर विथ फेस' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा विनोद चोप्रा यांनी सांभाळली आहे. मुलांच्या भावविश्वावर आधारित या सिनेमाची कथा समाजातील विविध घटकांवर भाष्य करणारी आहे. प्रेक्षकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे काम या सिनेमाने केले आहे. समाजातील असमानतेवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. 


सलाम बॉम्बे (Salaam Bombay) 1988


'सलाम बॉम्बे' हा हिंदी सिनेमा मीरा नायर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात बॉम्बे म्हणजेच मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांवर भाष्य करण्यात आले आहे. शफीक सय्यद, हंसा विठ्ठल, चंदा शर्मा, रघुवीर यादव, अनिता कंवर, नाना पाटेकर आणि इरफान खान या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 


लगान (Lagaan) 2001


आमीर खान प्रॉडक्शन निर्मित 'लगान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आशुतोष गोवारीकरने सांभाळली आहे. आजही हा सिनेमा आवडीने पाहिला जातो. लगानने परदेशी चित्रपटांच्या नामांकन यादीत अंतिम पाच चित्रपटांमध्ये स्थान मिळवले होते.


लिटिल टेररिस्ट (Little Terrorist) 2004


'लिटिल टेररिस्ट' हा लघुपट प्रसिद्ध डिझायनर रितू कुमार यांच्या मुलाने म्हणजेच अश्विन कुमारने दिग्दर्शत केला होता. वत्स गजेरा, सुशील शर्मा आणि मेगना मेहता हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. 


रायटिंग विथ फायर (Writing with Fire)


'रायटिंग विथ फायर' या माहितीपटाचे दिग्दर्शन रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष यांनी केले आहे. 'राइटिंग विथ फायर' सिनेमात 'खबर लहरिया'च्या उदयाची गोष्ट सांगितली आहे. 'खबर लहरिया' हे एक भारतातील वृत्तपत्र आहे. हे दलित महिलांनी चालवलेले भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. या माहितीपटात दलित महिलांवर भाष्य करण्यात आले आहे.


द व्हाइट टायगर (The White Tiger)


रामीन बहरानी लिखित आणि दिग्दर्शित 'द व्हाइट टायगर' हा सिनेमा एका कादंबरीवर आधारित आहे. आदर्श गौरव, प्रियांका चोप्रा जोनास आणि राजकुमार राव या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या सर्वात आकर्षक भारतीय चित्रपटांपैकी 'द व्हाइट टायगर' या सिनेमाची गणना होते. 


संबंधित बातम्या


Oscar Awards 2023 : 'अवतार : द वे ऑफ वॉटर' ते 'टॉप गन मेव्हरिक'; 'ऑस्कर'च्या शर्यतीत कोणते चित्रपट? पाहा नामांकन यादी