India Lockdown Trailer Out Now: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर (Madhur Bhandarkar) यांच्या 'इंडिया लॉकडाउन' (India Lockdown) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान अस्थाव्यस्थ झालेलं जनजीवन आणि त्यामुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती, यासंदर्भातील वास्तव हे 'इंडिया लॉकडाउन' या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  2020 मध्ये देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीला 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. पण नंतर हा लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आला. या दरम्यान अनेक लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागला. लॉकडाऊनच्या काळात वाहतूक व्यवस्था बंद असल्यानं काही कामगारांनी तर आपल्या गावी पायी जाण्याचा निर्णय घेतला. याच लोकांची कथा या चित्रपटात दाखण्यात येणार आहे. झी-5 च्या युट्यूब चॅनलवर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. 


'इंडिया लॉकडाउन' हा चित्रपट झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे.  या चित्रपटात प्रतीक बब्बर, श्वेता बासु प्रसाद, अहाना कुमार, प्रकाश बेलावेदी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. ती या चित्रपटात फूलमती ही भूमिका साकारणार आहे. 2 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


पाहा ट्रेलर: 



या वर्षातील मधुर भांडारकर यांचा ओटीटीवर रिलीज होणारा हा दुसरा चित्रपट असणार आहे. याआधी त्यांचा बबली बाउंसर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. या चित्रपटात तमन्ना भाटियानं मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये Disney+Hotstar वर रिलीज झाला होता. आता 'इंडिया लॉकडाउन'  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Mithila Palkar: 'असं वाटतंय डबा...'; मिथिला पालकरच्या लूकला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल