Independence Day 2023: स्वातंत्र्य दिन (Independence Day)  हा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक जण देशभक्तीपर चित्रपट पाहतात. तसेच देशभक्तीपर गाणी देखील अनेक जण स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐकतात. देशभक्तीवर आधारित गाणी ऐकून मनात अभिमानाची भावना जागृत होते. यंदा स्वातंत्र्य दिनाला तुम्ही ही मराठी गाणी ऐकू शकता.


उठा राष्ट्रवीर हो (Utha Rashtraveer Ho)


उठा राष्ट्रवीर हो हे गाणं हा माझा मार्ग एकला या चित्रपटामधील आहे. या गाण्याला सुधीर फडके यांनी संगीत दिलं आहेत. या गाण्याचे गीतकार रवींद्र भट हे आहेत. "उठा राष्ट्रवीर हो, सुसज्ज व्हा उठा चला, सशस्‍त्र व्हा उठा चला, उठा राष्ट्रवीर हो" असे या गाण्याचे बोल आहेत.



हे राष्ट्र देवतांचे (He Rashtra Devtanche)


हे राष्ट्र देवतांचे हे गाणे घरकुल या चित्रपटामधील आहे. हे गाणं गायिका राणी वर्मा यांनी गायलं आहे. सी. रामचंद्र यांनी हे या गाण्याचे संगीत दिग्दर्शक असून या गाण्याचे गीतकार ग.दि.माडगूळकर हे आहेत.