Independence Day 2022 : आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत.  त्यामुळं देशातील प्रत्येक नागरिक मोठ्या अभिमानानं स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (Independence Day 2022 :) साजरा करत आहे. देशात आज उत्साहाचं वातावरण आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी देखील स्वातंत्र्यदिन साजरा केला. काही सेलिब्रिटींनी हर घर तिरंगा या अभियानात सहभाग घेतला तर काहींनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावून स्वातंत्र्यदिन साजरा केला. 

शाहरुख खान

बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खान याने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच, त्याने चाहत्यांना आणि देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिरंगा फडकवल्यानंतर शाहरुख खानने कुटुंबासोबत फोटो देखील काढला. या फोटोत शाहरुख खानसह त्याची पत्नी गौरी खान आणि मुले अबराम आणि आर्यन दिसत आहेत.

सलमान खान

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानने  INS विशाखापट्टणमध्ये जाऊन भारतीय नौदलाच्या जवानांची भेट घेतली होती. सलमाननं नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान हा तिरंगा फडकवताना दिसत आहे. या फोटोला सलमाननं कॅप्शन दिलं, 'स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा... जय हिंद' 

अनिल कपूर

अनिल कपूर यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. 

अनुष्का शर्मा

अभिनेत्री अनुष्का शर्मानं स्वातंत्र्य दिनानिमित्त सोशल मीडियावर विराट कोहलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन अनुष्कानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जगभरातील भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा'

उर्वशी रौतेला

अभिनेत्री उर्वशी रौतेलानं देखील स्वातंत्र्यदिनानिमित्त एक खास फोटो शेअर केला. या फोटोमध्ये उर्वशी ही  तिरंगा फडकवताना दिसत आहे.  

नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाच्या दक्षिण मुंबईतील स्थिर इमारतीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जॅकी श्रॉफ, सुभाष घई, दिव्या दत्ता यांनी हजेरी लावली. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Independence Day 2022 : शाहरुखच्या ‘मन्नत’वर डौलाने फडकला तिरंगा! अभिनेत्याने कुटुंबासह चाहत्यांना दिल्या शुभेच्छा