शाहरुखचा अलिबागमधील बंगला आयकर विभागाकडून सील
एबीपी माझा वेब टीम | 30 Jan 2018 08:22 PM (IST)
शेतकरी असल्याचा बनाव करुन शाहरुख आणि गौरी खान यांनी अलिबागमध्ये जमिन खरेदी केली आणि त्यावर आलिशान बंगला बांधला, असा आरोप होता.
मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या अलिबागमधील फार्महाऊसवर आयकर विभागानं धाड टाकली आहे. अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेला 'देजाऊ' हा बंगला आयकर विभागानं सील केला आहे. बेहिशेबी संपत्ती प्रकरणातून ही कारवाई केल्याची माहिती आहे. शेतकरी असल्याचा बनाव करुन शाहरुख आणि गौरी खान यांनी अलिबागमध्ये जमिन खरेदी केली आणि त्यावर आलिशान बंगला बांधला, असा आरोप काही महिन्यांपूर्वी करण्यात आला होता.