नवी मुंबई : जस्टिन बिबरच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर तरूणाईने मोठी गर्दी केली आहे. पॉपस्टार जस्टिनचा भारतातला हा पहिलाच कार्यक्रम आहे.

इंडियन्स एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये जस्टिन बिबरला पाहण्याच्या उत्सुकतेने 50 चाहते बेशुद्ध पडल्याची माहिती आहे. त्यांना प्रथोमपचार देण्यात आले आहेत.

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही जस्टिनला पाहण्यासाठी डी. वाय. पाटील स्टेडिअमवर दाखल झाले आहेत. यामध्ये अभिनेत्री श्रीदेवी, आलीया भट्ट, अरबाज खान, मलायका अरोरा-खान, जान्हवी कपूर, बोनी कपूर, अनू मलिक यांच्यासह दिग्गज सेलिब्रिटींचा समावेश आहे.

जस्टिन बिबरला पाहण्यासाठी नवी मुंबईत दिग्गजांची हजेरी

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही मुंबईत जस्टिनची भेट घेतली. आदित्य ठाकरेंवरही जस्टिन बिबर यांचं फिव्हर असल्याचं यामुळे स्पष्ट झालं. खरं तर जेव्हा मायकल जॅक्सन भारतात आला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनीही भेट घेतली होती. आता तशीच तत्परता आदित्य ठाकरेंनी दाखवली. वाशीमधील एका हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि जस्टीन यांच्यामध्ये दोन तास चर्चा झाली.

जस्टिन बिबरच्या शोसाठी 5 हजारांपासून 15 हजारांपर्यंतच्या तिकीटांचा दर असूनही लोकांच्या रांगा याठिकाणी लागलेल्या आहेत. सुमारे 50 हजार चाहते या कॉन्सर्टसाठी उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. डी वाय पाटील परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

कोण आहे जस्टिन बिबर?

बेबी…बेबी… हे गाणं जर कोणी ऐकलं-पाहिलं असेल, तर त्याला जस्टिन बिबर कोण हे सांगण्याची गरज नाही.

जस्टिन बिबर हा जगभरात गाजलेला पॉप गायक आहे. अवघ्या 23 वर्षांच्या जस्टिन बिबरचा जन्म कॅनडात 1994 मध्ये झाला.

जस्टिन बिबर तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. त्याचीच झलक ट्विटरवर पाहायला मिळते. ट्विटरवर जस्टिन बिबरचे 9 कोटी 34 लाख 42 हजार फॉलोअर्स आहेत.

2 फाईव्ह स्टार हॉटेल, 1 हेलिकॉप्टर, जस्टिन बिबरच्या मागण्यांची यादी


एकेकाळी जस्टिन बिबरसोबत सेल्फी काढण्यासाठी 2000 डॉलर अर्थात लाखापेक्षा जास्त रुपये खर्च करावे लागत.

जस्टिन बिबरने मानाचा ग्रॅमी अवॉर्ड पटकावला आहे. इतकंच नाही तर जगप्रसिद्ध फोर्ब्ज मासिकाने त्याला तीन वेळा जगातील सर्वात पॉवरफुल सेलिब्रिटी म्हणून गौरवलं आहे.

सलमानचा शेरा आता जस्टिन बीबरचा बॉडीगार्ड!


गेल्या 5 वर्षात जस्टिन बिबर हे नाव सातत्याने ऐकायला मिळालं. पूर्वी लोक हे नाव ऐकून न ऐकल्यासारखं करायचे, मात्र आता त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाहीत.

 जस्टिन बिबरकडे डिजीटल मीडियातील एक सक्सेस स्टोरी म्हणून पाहिल जातं. कारण 2008 मध्ये त्याचे काही यूट्यूब व्हिडीओ समोर आले आणि एका टॅलेंट मॅनेजरने त्याचे पाय पाळण्यात ओळखले.

भारतात येण्यापूर्वी सनी लिओनीचा जस्टीन बीबरला खास सल्ला


जस्टिन बिबरचा 2010 मध्ये एक स्टुडिओ अल्बम रिलीज झाला आणि तो रातोरात स्टार झाला.

संबंधित बातम्या :


जस्टिन बिबर मुंबईत दाखल, कॉन्सर्टसाठी चाहत्यांची झुंबड


सलमानचा शेरा आता जस्टिन बीबरचा बॉडीगार्ड!


2 फाईव्ह स्टार हॉटेल, 1 हेलिकॉप्टर, जस्टिन बिबरच्या मागण्यांची यादी 


जस्टिन बिबरची संपत्ती किती?


मायकल जॅक्सन ते जस्टिन बिबर, वादांची मालिका