IMDb Web Series:  ओटीटीवरील (OTT) वेब सीरिज (Web Series) बिंच वॉच करायला अनेकांना आवडतात. विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज बघायला आनेकांना आवडतं. कोणती वेब सीरिज बघावी? असा प्रश्न जर तुम्हाला वीकेंडला पडत असेल तर तुम्ही या पाच वेब सीरिजपैकी एक वेब सीरिज या वीकेंडला बिंच वॉच करु शकता. या पाच वेब सीरिजला IMDb वर सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे.


स्कॅम-1992 (Scam 1992)


2020 मध्ये  सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या स्कॅम-1992 ही वेब सीरिज प्रेक्षकांना खूप आवडली होती. हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या या वेब सीरिजमध्ये अभिनेता प्रतीक गांधीनं मुख्य भूमिकेत दिसत आहे. IMDb वर या वेब सीरिजला 9.3 रेटिंग मिळाले आहे.






TVF  पिचर्स (TVF Pitchers)


TVF  पिचर्स ही ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेब सीरिज मानली जाते. TTVF  पिचर्स चे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटील आले. हे दोनही सीझन प्रेक्षकांना खूप आवडले होते. वेब सीरिजची कथा स्टार्टअप्स आणि फंडिंगभोवती फिरते. IMDb वर या वेब सीरिजला  9.1  रेटिंग दिले आहे.


रॉकेट बॉईज (Rocket Boys)


गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या वेब सीरिजचे दोन सीझन आहेत. हे सीझन्स हिट ठरले आहेत. या वेब सीरिजला IMDb वर 8.9 रेटिंग मिळाले आहे.






कोटा फॅक्टरी (Kota Factory)



कोटा फॅक्ट्री ही वेब सीरिज तुम्ही Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता. 'कोटा फॅक्टरी'चे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले असून त्याचा तिसरा सीझन देखील लवकरच रिलीज होणार आहे. कोटा फॅक्टरीची कथा कोटा येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर आधारित आहे. IMDb वर या वेब सीरिजला 9 रेटिंग मिळाले आहे.


एस्पिरेंट्स (Aspirants)


2021 मध्ये रिलीज झालेल्या एस्पिरेंट्स या वेब सीरिजची कथा UPAC एस्पिरेंट्सवर आधारित आहे. या वेब सीरिजला IMDb वर 9.2 रेटिंग मिळाले आहे.


महत्वाच्या बातम्या :  


Ott Releases This Week:  प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; वीकेंडला ओटीटीवर घरबसल्या पाहा हे चित्रपट