IFFM : 'इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न' (IFFM) हा भारताबाहेर आयोजित होणार सर्वात मोठा फिल्म फेस्टिव्हल आहे. या महोत्सवात समीक्षकांची पसंती मिळालेले 100 हून अधिक सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळतात. 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न' 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. तसेच या महोत्सवात 'माली'चा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. 


'माली'चा होणार वर्ल्ड प्रीमियर


'इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न' या महोत्सवाची सुरुवात अनुराग कश्यप दिग्दर्शित तापसी पन्नूच्या 'दोबारा' या सिनेमाने होणार आहे. तर या महोत्सवात 'माली' सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. हा सिनेमा सामाजिक संदेश देणारा आहे. पर्यावरणावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. 


18 ऑगस्टला होणार 'माली'चा वर्ल्ड प्रीमियर


वास्तवावर भाष्य करणारा 'माली' सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. 'इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न'मध्ये 18 ऑगस्टला 'माली'चा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. लोकांना झाडांचं महत्त्व कळावं या हेतूने या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'माली' हा सिनेमा 16 वर्षीय तुलसीवर आधारित आहे. 


सिनेप्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी


गेल्या दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे 'इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न' वर्चुअल स्वरुपात होत होता. पण यंदाचा महोत्सव पुन्हा एकदा दिमाखदार पद्धतीने होणार आहे. 'इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न' 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. सिनेप्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळणार आहे. 


बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि क्रिकेटपटून कपिल देव आता भारताचा झेंडा ऑस्ट्रेलियामध्ये फडकवणार आहेत. अभिषेक बच्चन आणि कपिल देव यांना मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये आमंत्रित करण्यात आलं आहे. अभिषेक आणि कपिल दोघेही या महोत्सवासाठी उत्सुक आहेत.  


संबंधित बातम्या


IFFM : अभिषेक बच्चन आणि कपिल देव ऑस्ट्रेलियामध्ये फडकवणार तिरंगा; मेलबर्न फिल्म फेस्टिवलमध्ये लावणार हजेरी


Jignesh Mehta : मॉडेलवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहताविरुद्ध एफआयआर दाखल!