राज आणि नाना यांच्या वादाबाबत विचारलं असता, मकरंद अनासपुरे म्हणाले, “त्याबाबत प्रतिक्रिया देण्याचा चोंबडेपणा मी कशाला करु”
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी ‘नाम’ या संस्थेमार्फत दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिला. नाना आणि मकरंद यांनी एकत्र काम करुन, दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला होता.
त्यामुळे मकरंद अनासपुरे यांना नाना-राज यांच्यातील वादाबाबत विचारलं असता, त्यांनी सावध भूमिका घेतली.
नाना आणि राज ठाकरेंचा वाद
एलफिन्स्टन चेंगराचेंगरीनंतर राज ठाकरे यांच्या मनसेने अवैध फेरीवाल्यांविरोधात आंदोलन छेडलं आहे. मात्र भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता, असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला.
नाना पाटेकरांनी माहिती नसताना उगाच चोंबडेपणा करु नये : राज ठाकरे
नानांच्या या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. “नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करु नये, ज्या विषयाची माहिती आहे, त्याबद्दल बोलावं,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी नानांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.
राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं : नाना
राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर दुखावलेल्या नाना पाटेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. “प्रत्येकाला बोलण्याचा, आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझा मांडला. राज ठाकरे यांचं काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं,” अशी प्रतिक्रिया अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली.
VIDEO:
संबंधित बातम्या
भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांना का हटवता? : नाना पाटेकर
नाना पाटेकरांनी माहिती नसताना उगाच चोंबडेपणा करु नये : राज ठाकरे
राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं : नाना
मनसेचा प्रचार ब्ल्यू प्रिंटने, तर भाजपचा ब्ल्यू फिल्म दाखवून : राज ठाकरे