मुंबई : "जर एखाद्या सिनेमाच्या कथेसाठी मला टक्कल करावं लागलं तर मी तयार आहे," असं बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने म्हटलं आहे. "कथा केवढी सशक्त आहे आणि त्यातील भूमिका साकारण्यासाठी मी किती गंभीर आहे, यावर माझा निर्णय अवलंबून असेल," असंही दिशा म्हणाली.


दिशा म्हणते, "चित्रपटासाठी टक्कल गरजेचं असेल तर मी त्यासाठी तयार आहे. अभिनेत्री आपल्या केसांवर फारसे प्रयोग करत नाहीत. कारण बऱ्याचशा अभिनेत्री चित्रपटांपासून जाहिरातींपर्यंतच्या अनेक प्रोजेक्टशी संबंधित असतात. त्यामुळे बरेच दिवस एखाद्या विशेष लूकमध्ये राहणं त्यांच्यासाठी आवश्यक असतं.

'एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी'  फेम अभिनेत्री दिशा पटानी गार्निअर कलर नॅचरल्सची ब्रॅण्ड अम्बेसेडरही आहे. "माझ्या केसांवर विविध प्रकारचे केमिकल्स आणि सीरम लावलं जातं. मला केसांची नियमित काळजी घ्यावी लागते. नव्या लूकसाठी केस कलर करणं योग्य उपाय आहे," असं दिशा पटानीने सांगितलं.