अनौरस संतती संबोधून ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देताना मसाबा म्हणाली की, "मला याचा अभिमान आहे."
काय आहे प्रकरण?
सर्वोच्च न्यायालयाने फटक्यांवर घाललेल्या बंदीचं फॅशन डिझायनर मसाबाने स्वागत केलं होतं. फटाकेबंदीच्या समर्थनार्थ ट्वीट तिने केलं होतं. पण या ट्वीटनंतर ट्रोलर्स तिच्या हात धुवून मागे लागले. यानंतर मसाबाने खुलं पत्र ट्वीट करुन ट्रोलर्सना चोख उत्तर दिलं.
https://twitter.com/MasabaG/status/918325963171151873
मसाबा लिहिते, "मला अनौरस अपत्य आणि अनौरस वेस्ट इंडियन म्हटलं. पण हे ऐकून मला फारच अभिमान वाटला. दोन वैध व्यक्तींचं मी अनौरस अपत्य आहे. मी वैयक्तिक आणि व्यायसायिकदृष्ट्या माझं आयुष्य शानदार बनवलं आहे. मला त्याचा गर्व आहे.
10 वर्षांची असल्यापासून मला अशा नावांनी संबोधलं जातं. तेव्हापासून हे शब्द माझ्या रक्तात भिनले आहेत.
माझी वैधता माझ्या कामामुळे आणि समाजाप्रती असेलल्या योगदानातून येते. प्रयत्न करा पण तुम्ही माझ्याकडे बोट दाखवू शकत नाही.
मला ह्या नावांनी संबोधून तुम्हाला आनंद मिळणार असेल तर खुशाल बोला. इंडो-कॅरेबियन मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. तुम्ही आणि समाज ज्या गोष्टी सांभाळू शकत नाही, त्यासमोर लाजेने झुकणं काय असतं हे मला माहित नाही. हे माझ्या 'अनौरस' जीन्समध्येच आहे."