पुणे : 'लैला मजनू' चित्रपटामुळे नावारुपास आलेली, गतकाळातील अभिनेत्री रंजिता कौर यांनी मारहाण केल्याचा आरोप केल्याच्या दुसऱ्याच दिवशी तक्रारदार पती राज रतन मसंद यांनी आपल्यात सारं काही आलबेल असल्याचा सूर आळवला. मसंद यांनी रंजिता आणि पुत्र स्कायने धमकावून, मारहाण करुन पैसे उकळल्याची तक्रार पोलिसात केल्याचं वृत्त 'पुणे मिरर'ने दिलं होतं.
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात 60 वर्षीय अभिनेत्री रंजिता कौर 68 वर्षीय पती राज रतन मसंद आणि 28 वर्षीय मुलगा स्कायसोबत राहतात. मात्र संपत्तीच्या वादातून काही दिवसांपूर्वी त्यांच्यात खटके उडाल्याची माहिती आहे.
'प्रत्येक कुटुंबात काही ना काही वाद होतच असतात. माझ्या पतीचा यूएसमध्ये बिझनेस आहे. माझा मुलगाही तिथेच व्यवसाय करतो. दोघांमध्ये त्यावरुनच वाद झाले होते. पतीने डोक्यात राग घालून पोलिसांकडे धाव घेतली. मात्र आता सामोपचाराने आम्ही वाद मिटवला आहे' असा दावा रंजिता यांनी केला.
'खरं तर हा कौटुंबिक वाद होता. मात्र त्या दिवशी मुलाने माझ्यावर दात-ओठ खात चाल केल्याने मी अवाक होतो. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आम्ही मतभेद दूर केले' असं राज मसंद यांनी स्पष्ट केलं.
रंजिता यांनी 'लैला मजनू', पती पत्नी और वो, तेरी कसम, हम से बढकर कौन, तराना यासारख्या चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत.
अभिनेत्री रंजिता कौरकडून मारहाण, आधी आरोप, नंतर पतीचं घूमजाव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 May 2019 11:52 AM (IST)
लैला मजनू, पती पत्नी और वो यासारख्या चित्रपटात झळकलेल्या अभिनेत्री रंजिता कौर यांच्यासह मुलाने मारहाण केल्याचा आरोप पतीने केला होता. मात्र हा वाद सामोपचाराने मिटवण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -