Hum Do Hamare Baraah : भारतात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढताना दिसत आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी जागरूकता मोहीम राबवण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, भारत पुढल्या वर्षी लोकसंख्येच्या बाबतीत चीनलादेखील मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल. याच विषयावर भाष्य करणाऱ्या 'हम दो हमारे बारह' (Hum Do Hamare Baraah) या सिनेमाचे पोस्टर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.
मुंबईत नुकतेच 'हम दो हमारे बारह' या सिनेमाचे पोस्टर आऊट करण्यात आले. काही विशिष्ट लोकांमुळे देशाच्या लोकसंख्येत वाढ होत असल्याचे सिनेमात दाखवण्यात आले आहे. तसेच 'लवकरच चीनला मागे टाकू' असे पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. यासंदर्भात एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अन्नू कपूर म्हणाला,"देशाची लोकसंख्या कमी होणं गरजेचं आहे. या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवं".
अन्नू कपूर म्हणाला, 'हम दो हमारे बारह' या सिनेमाच्या पोस्टमुळे सिनेमावर टीका करणं चुकीचं आहे. ज्यापद्धतीने पुस्तकाच्या कवरवरून ते पुस्तक किती चांगलं आहे हे ठरवता येत नाही. हा सिनेमा नक्कीच एक चांगला संदेश देणारा सिनेमा आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आधी सिनेमा पाहावा".
'हम दो हमारे बारह' या सिनेमात अन्नू कपूर आणि मनोज जोशी आणि अश्विनी कलसेकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'हम दो हमारे बारह' या सिनेमावर काही नेटकरी टीका करत आहेत. तर काही मंडळी मात्र या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या