''यशराज फिल्म्स'च्या डान्स-अॅक्शन चित्रपटाला दिशा पटाणीने रामराम ठोकला. याचं कारण म्हणजे हृतिक रोशनने तिच्यासोबत केलेलं फ्लर्टिंग. अन्कम्फर्टेबल झाल्यामुळे दिशाला अखेर सिनेमा सोडावा लागला' असं पत्रिका वेबसाईटवरील बातमीत म्हटलं होतं.
'माझे प्रिय मित्र पत्रिका जी, कसरत करता का? थोडं जिमला जात जा. डोक्यातून कचरा काढून टाका. 20 डाँकी किक्स, 20 मंकी रोल्स, दोन डॉग जम्प्स तुमच्यासाठी चांगल्या ठरतील. नक्की प्रयत्न करा. शुभेच्छा. गुड डे. लव्ह यू टू' असं ट्वीट हृतिकने केलं. अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या गंभीर आरोपानंतर आणखी एका अभिनेत्रीने हृतिकला कंटाळून सिनेमा सोडला असा उल्लेख या बातमीत होता.
'माझ्या आणि हृतिक सरांबद्दल अत्यंत बालिश आणि बेजबाबदार गॉसिप सुरु आहे. ते पूर्णपणे चुकीचं आहे. आम्हा दोघांमध्ये फार थोडं बोलणं झालं, मात्र ते अत्यंत प्रतिष्ठित आणि मनमोकळ्या स्वभावाचे आहेत. त्यांच्यासोबत असेलल्या कोणत्याही प्रोजेक्टमधून मी माघार घेतल्याचं वृत्त खोटं आहे.' असं दिशाने म्हटलं आहे.