नवी दिल्ली : अभिनेता टायगर श्रॉफ आणि नवाजुद्दिन सिद्दिकीची मुख्य भूमिका असलेला 'मुन्ना मायकल' सिनेमाबद्दल अनेकांना उत्सुकता होती. बऱ्यापैकी रसिकांनी सिनेमा पाहिलाही. मात्र, अपेक्षित प्रतिसाद सिनेमाला मिळताना दिसत नाही. 'मुन्ना मायकल' सिनेमाने भारतात प्रदर्शनानंतर चार दिवसात केवळ 24 कोटी 92 लाख रुपयांची कमाई केली आहे. ट्रेड अनॅलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटवरुन याबाबत माहिती दिली. 'मुन्ना मायकल'ची भारतातील कमाई -
  • पहिला दिवस - 6.65 कोटी
  • दुसरा दिवस - 6.32 कोटी
  • तिसरा दिवस - 8.70 कोटी
  • चौथा दिवस - 3.25 कोटी
या सिनेमातून अभिनेता टायगर श्रॉफने दिवंगत पॉप डान्सर मायकल जॅक्सन यांना अभिवादन केले आहे. अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी यात निगेटिव्ह रोलमध्ये आहे. मायकल जॅक्सनला आपला आदर्श मानणाऱ्या मुंबईतील तरुणाची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. https://twitter.com/taran_adarsh/status/889746381547520001 सब्बीर खान यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. 'हिरोपंती' आणि 'बागी'नंतर सलग तिसऱ्या सिनेमात टायगर आणि सब्बीर यांनी सोबत काम केले आहे.