Hema Malini on Ram Mandir Inauguration Ayodhya : राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा देशभरात जल्लोष पाहायला मिळत आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे. अयोध्येत बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनीचा खास परफॉर्मन्स असणार आहे. त्या रामायणावरील नृत्यनाटिका सादर करणार आहेत. एक व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने यासंदर्भात माहिती दिली आहे.


प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान हेमा मालिनी रामायणावर आधारित नृत्यनाटिका सादर करणार आहेत. या नृत्यनाटिकेत हेमा मालिनी यांचा खास डान्स परफॉर्मन्स असणार आहे. 'ड्रीम गर्ल'ने व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे आता बसंतीचं सादरीकरण पाहायला चाहते उत्सुक आहेत.






हेमा मालिनी यांनी व्हिडीओ शेअर करत दिली माहिती (Hema Malini Shared Video)


हेमा मालिनी म्हणत आहेत,"जय श्रीराम... मी पहिल्यांदाच अयोध्येत येणार आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान मी अयोध्येला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोक या दिवसाची प्रतीक्षा करत आहेत. 14 ते 22 जानेवारी दरम्यान जगत गुरु पद्म विभूषण तुलसी पीठाधीश्वर जगत गुरू रामनंद स्वामी रामभद्राचार्य यांचा 75 वा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे".


हेमा मालिनी पुढे म्हणाल्या,"गुरुदेव यांच्या जन्मोत्सावचं औचित्य साधत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यादरम्यान मी माझ्या टीमसह 17 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता रामायणावर आधारित नृत्य नाटिका सादर करणार आहे. नृत्यनाटिका पाहायला अयोध्येत नक्की या". 


प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला 'हे' सेलिब्रिटी राहणार उपस्थित


अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. यात अमिताभ बच्चन, कंगना रनौत, टायगर श्रॉफ, माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अजय देवगन, रजनीकांत, धनुष, यश, प्रभास, राम चरणसह अरुण गोविल, दीपिका चिखलियासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. 


प्राण प्रतिष्ठा मुहूर्त (Ram Mandir Pran Pratishtha 2024 Muhurat)


अयोध्येतील राम मंदिरासाठी जवळपास पाच शतकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल.


संबंधित बातम्या


Ayodhya Ram Mandir : अयोध्यानगरी सजली! राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी होणार 'हे' विधी; पाहा संपूर्ण यादी