Anurag Thakur On OTT:  ओटीटीवरील चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये अनेक वेळा शिव्या असणारे डायलॉग्स, काही बोल्ड सिन्स यांसारख्या गोष्टी दाखवल्या जातात. ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर वाईट परिणाम होतो, असंही म्हटलं जातं. नुकतंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सांगितले आहे की, क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली ओटीटीवरील असभ्यता आणि अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही. 


अनुराग ठाकूर यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लील कंटेंटबाबत सांगितलं. ते म्हणाले, "ओटीटी प्लॅटफॉर्मवर अपमानास्पद आणि अश्लील कंटेंट वाढत असल्याच्या तक्रारींबाबत सरकार गंभीर आहे. यासंदर्भात नियमांमध्ये काही बदल करण्याची गरज भासल्यास त्यावर विचार करण्याची मंत्रालयाची तयारी आहे."


अनुराग ठाकूर यांचे ट्वीट 


अनुराग ठाकूर यांच्या ट्विटर अकाऊंटवर देखील ओटीटी कंटेंटबाबत ट्वीट शेअर करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, "क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली गैरवर्तन, असभ्यपणा खपवून घेतला जाऊ शकत नाही. ओटीटीवर अश्लील कंटेंट वाढत असल्याच्या तक्रारीबाबत सरकार गंभीर आहे. याबाबत नियमांमध्ये काही बदल करण्याची गरज भासल्यास माहिती आणि प्रसारण मंत्रालय त्यामध्ये मागे हटणार नाही. अश्लीलता आणि गैरवर्तन थांबवण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल."






तक्रारींमध्ये वाढ 


अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटबाबतच्या तक्रारींमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. निर्मात्यांना प्रथम स्तरावर आलेल्या तक्रारींवर काम करावे लागते. सुमारे 90 ते 92 टक्के तक्रारी त्यांच्याकडून आवश्यक बदल करून सोडवल्या जातात. तक्रार सोडवण्याची पुढील पातळी त्यांच्या सहकार्याच्या पातळीवर आहे. शेवटी तक्रार प्रशासन स्तरावर येते, जेथे विभाग समिती स्तरावर नियमांनुसार कारवाई केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांत तक्रारींचे प्रमाण वाढले असून, विभाग याकडे गांभीर्याने पाहत आहे. त्यात काही बदल करायचे असतील तर त्याचा गांभीर्याने विचार करू.'


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Entertainment News Live Updates 20 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!