मुंबई : बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि बॉलिवूडचे सुपरमॅन धमेंद्र पुन्हा एकदा आजी-आजोबा बनणार आहेत. देओल कुटुंबात लवकरच पाळणा हलणार आहे. हेमा मालिनी आणि धमेंद्र यांची मुलगी अभिनेत्री ईशा देओल प्रेग्नंट आहे.
ईशा देओल आणि तिचा उद्योजक पती भरत तख्तानी लवकरच आई-बाबा बनणार आहे. मात्र हेमा मालिनी किंवा ईशाच्या कुटुंबाने केलेली नाही.
परंतु हेमा मालिनी यांच्या आयुष्यावर पुस्तक लिहिणारे लेखक गोपाल कमल मुखर्जी यांनी ही गोड बातमी शेअर केली आहे. गोपाल कमल मुखर्जी 'बियॉन्ड द हेमा मालिनी' हे पुस्तक लिहित आहेत.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी दुसऱ्यांदा आजोबा-आजी बनणार आहेत. याआधी ते धाकटी मुलगी आहानाच्या मुलाचे आजोबा-आजी बनले आहेत. ईशा देओल सध्या आई हेमा मालिनीसह जुहूतील बंगल्यात राहत आहे.
काही वृत्तानुसार, जुहूतील घरात हेमा मालिनी ईशाच्या येणाऱ्या बाळासाठी एक सुंदर खोलीही बनवत आहेत. ईशा देओलचा शेवटची 'किल देम यंग' या चित्रपटात दिसली होती. 2015 मध्ये आलेल्या या सिनेमानंतर ती बॉलिवूडपासून दूरच आहे.