चंदीगढः उडता पंजाब या सिनेमाला मुंबई हायकोर्टाने प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले असले तरी, या सिनेमावर वादाचं ग्रहण कायम आहे. पंजाब-हरियाणा हायकोर्टाने सिनेमा रिलीज करण्यापूर्वी प्री-स्क्रिनिंग करण्याची अट ठेवली आहे.


 

पंजाब-हरियाणा हायकोर्टाने सेन्सॉर बोर्ड आणि उडता पंजाबचे निर्माते यांना 14 जून रोजी प्री स्क्रिनिंगचं आयोजन करण्याची नोटीस बजावली आहे. सिनेमा पाहिल्यानंतर मान्यता देण्याबाबत कोर्ट  निर्णय घेईल, असं वकिलांनी सांगितलं. आज या सिनेमाचं प्री स्क्रिनिंग केलं जाणार आहे.

 

पंजाब राज्यातील ड्रग्जच्या समस्येवर हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या भावना दुखू नयेत, यासाठी सिनेमा पाहूनच कोर्ट निर्णय घेईल, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

 

मुंबई हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला उडता पंजाब सिनेमात 89 कट सुचवून प्रदर्शन रोखल्याबद्दल चांगलंच सुनावलं होतं. त्यानंतर कोर्टाने सिनेमाला प्रमाणपत्र देण्याचे आदेशही दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयानंतर उडता पंजाबच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता, मात्र पंजाब आणि हरियाणा राज्यात सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी कोर्ट सिनेमाची पडताळणी करणार आहे. त्यामुळे उडता पंजाब सिनेमावर वादाचं ग्रहण कायम दिसत आहे.


संबंधित बातम्याः


89 नव्हे, एकच कट, 'उडता पंजाब'ला हायकोर्टाचा दिलासा


'उडता पंजाब'ला सेन्सॉरकडून 'ए' सर्टिफिकेट, आज हायकोर्टात सुनावणी


तुम्ही फक्त प्रमाणपत्रं द्या, निवडीचा अधिकार प्रेक्षकांनाः हायकोर्ट


'उडता पंजाब' वाद: मुंबई हायकोर्टात आज काय झालं?