‘हेट स्टोरी-4’ च्या रिलीज पूर्वी सिनेमाच्या टीमने मीडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत सिनेमात दाखवण्यात आलेल्या बोल्ड सीनसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्याची उत्तरही दिग्दर्शकाने अतिशय मोकळेपणाने दिली.
या सिनेमातील बोल्ड सीनसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिग्दर्शक विशाल पांड्या म्हणाला की, “जेव्हा तुम्ही एखादा टीव्ही शो पाहता, तेव्हा त्यावेळी ब्रेकदरम्यान जाहिराती दाखवल्या जातात. या जाहिरातींमध्ये कलाकार किसिंग करताना दिसतात. तेव्हा हे सर्व ठिक वाटतं. पण जेव्हा हे सर्व आपल्याला सिनेमागृहात पाहायला मिळतं, तेव्हा ते नेहमीच चुकीचं असतं”
यावर स्पष्टीकरण देताना विशाल पांड्या पुढे म्हणतो की, “असे अनेक सिनेमे आहेत, ज्याबाबत सांगितलं जातं की, मोठ्या कलाकारांची किसिंग सीन नाहीत. पण मूळात, मोठा किंवा लहान कलाकार असं काहीही नसतं. जर सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये तसं असेल, तर ते करावंच लागतं. या सिनेमात मी फक्त पती आणि पत्नीचे किसिंग सीन दाखवले आहेत. आणि त्यात काही गैर आहे, असं मला मुळीच वाटत नाही.”
‘हेट स्टोरी-4’ मध्ये उर्वशी रौतेला, विवान भटेना, करण वाही आणि इहाना ढिल्लनसारखे कलाकार आहेत. हा सिनेमा 9 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी यापूर्वीच रिलीज करण्यात आली होती. यातून सिनेमात बोल्ड सीनचा भडीमार असल्याचे स्पष्ट दिसत होते.