भाजप प्रवेशाबाबत बोलताना सपना म्हणाली की, भाजपत प्रवेश करण्यापूर्वी काहिही विचार करण्याची आवश्यकता नव्हती. मी मातीशी जोडलेली आहे. पक्षाच्या कामाने प्रभावित आहे. त्यामुळेच मी भाजप प्रवेश केला.
परळीतील गणेशोत्सवात डान्सर सपना चौधरीचे ठुमके
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी सपना चौधरीने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती. उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार हेमा मालिनी यांच्याविरोधात सपना चौधरी काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याचीदेखील चर्चा रंगली होती.
सपनाचा काँग्रेस प्रवेश आणि निवडणुकीचं तिकीट यावरुन अनेक वादही झाले. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांसोबतचे सपनाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे सपनाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, असे सर्वांना वाटत होते. परंतु या सर्व वादांनंतर सपनाने स्वतः आपण कांग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचे जाहीर केले.
सपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ, एकाचा मृत्यू | बेगूसराय | बिहार | एबीपी माझा