मुंबई : 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये महिलांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुल या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे हे दोघेही नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकले.
या संपूर्ण प्रकारानंतर हार्दिकची एक्स गर्लफ्रेंड एली अवरामने मौन सोडले आहे. एली म्हणाली की, "मी पाहिलेला हार्दिक पंड्या तो हा नाही. मी हार्दिकला चांगलं ओळखते. यापूर्वी हार्दिक अशा प्रकारे कधीच बोलला नाही. तो असं बोलतही नाही. त्याच्या त्या वक्तव्यांचं मलाही आश्चर्य वाटलं आहे.
एली म्हणाली की, "तुम्ही जेव्हा एखाद्या मोठ्या पदार्यंत किंवा मोठ्या स्तरावार पोहोचता तेव्हा अनेक लोक तुमचा आदर्श घेत असतात. तुम्हाला फॉलो करत असतात. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची वक्तव्ये करणं अतिशय चुकीचं आहे. तसे केल्यास तुम्ही तुमच्याच चाहत्यांच्या नजरेतून उतरता."
काय आहे प्रकरण?
25 वर्षीय हार्दिक पंड्या केएल राहुलसह चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये आला होता. या शोमध्ये त्याने अनेक वादग्रस्त टिप्पणी केल्या होत्या. "एकच मेसेज अनेक मुलींना पाठवण्यात मला काहीच अडचण नाही आणि मी त्यांच्याशी त्यांच्या 'उपलब्ध' असण्याबाबत खुलेआम चर्चा करतो," असं हार्दिकने शोमध्ये सांगितलं.
आपण अनेक महिलांसोबत रिलेशनशिप होतो आणि ही बाब पालकांनाही माहित असल्याची कबुली हार्दिक पंड्याने शोमध्ये दिली. तो म्हणाला की, "जेव्हा मी कौमार्य गमावलं, त्यावेळी आई-वडिलांना 'आज मी करुन आलोय' असं सांगितलं होतं.
यानंतर सोशल मीडियावर हार्दिक पंड्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. या टिप्पणीनंतर सगळ्यांनीच सोशल मीडियावर त्याची शाळा घेतली. आपली चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने बुधवारी एका ट्वीटच्या माध्यमातून खेद व्यक्त करत माफी मागितली. "कॉफी विद करणध्ये माझ्या टिप्पणीमुळे जे दुखावले किंवा ज्यांना अपमान झाल्याचं वाटलं त्या सगळ्यांची माफी मागतो. मी जरा जास्तच बोललो. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या."
'कॉफी...'मधल्या प्रकारानंतर हार्दिकची एक्स गर्लफेंड म्हणते...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jan 2019 09:20 PM (IST)
'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये महिलांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुल या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या संपूर्ण प्रकारानंतर हार्दिकची एक्स गर्लफ्रेंड एली अवरामने मौन सोडले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -