मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) चार वर्षाचा संसार मोडला आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic) यांनी घटस्फोट घेतला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. आयपीएल 2024 पासून दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं बोललं जात होतं. आता या दोघांनीही सहमतीने चार वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं इंस्टाग्राम पोस्टद्वारे जाहीर केलं आहे. 

हार्दिक-नताशाचा घटस्फोट

आयपीएलदरम्यान हार्दिक-नताशा वेगळे झाल्याचं बोललं जातं होतं. मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनलेल्या हार्दिकसाठी नताशा एकदाही स्टेडिअममध्ये त्याचा उत्साह वाढवताना दिसली नाही. भारताने टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही नताशाने त्यांच्या अभिनंदनासाठी सोशल मीडियावर पोस्ट केली नाही. भारताच्या विश्वचषकातील विजयात हार्दिकने मोलाची कामगिरी केली, पण यानिमित्तानेही नताशानं त्याचं अभिनंदन केलं नाही. त्यामुळे यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचं बोललं जात होतं. आता या दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे.

विभक्त झाल्याची घोषणा

नताशा आणि हार्दिकच्या विभक्त झाल्याच्या बातम्या आयपीएलच्या वेळेपासूनच येऊ लागल्या. त्यावेळी दोघेही वेगळं झाल्याचं बोललं जात होतं. नताशाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हार्दिकसोबतचे लग्नाचे फोटो हटवल्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर हे जोडपे विभक्त झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी नताशाने हे फोटो रिस्टोअर करून घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम दिला होता. 

नात्यातील दुराव्याची चर्चा

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे होते, पण नताशा या आनंदात सहभागी होताना दिसली नव्हती. यानंतर, भारताने टी20 विश्वचषक जिंकल्यानंतरही नताशाने हार्दिकसाठी कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या हार्दिकची पत्नी नताशा त्याचे अभिनंदन करणारी पोस्ट शेअर करेल, अशी लोकांना आशा होती, पण तसे झाले नाही. त्यामुळे हे दोघे विभक्त झाल्याचं बोललं जात होतं.

घटस्फोटाबद्दल हार्दिक पांड्याची इंस्टाग्राम पोस्ट

हार्दिक आणि नताशाचं 2020 मध्ये लग्न

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी 31 मे 2020 रोजी लग्नगाठ बांधली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना ही माहिती दिली. त्याच वर्षी, 30 जुलै 2020 रोजी त्यांचा मुलगा अगस्त्यचा जन्म झाला. त्यानंतर 2023 मध्ये दोघांचं पुन्हा एकदा थाटामाटात लग्न पार पडलं.

घटस्फोटानंतर नताशाला किती पोटगी मिळणार?

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, हार्दिक आणि नताशाने परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात हार्दिक त्याच्या संपत्तीतील 70 टक्के हिस्सा नताशाला देणार असल्याचं मान्य केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Hardik-Natasa Divorce : हार्दिक - नताशाचा घटस्फोट, मुलगा अगस्त्य कोणाकडे राहणार?