मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. सायरा बानो यांचा जन्म 23 ऑगस्ट 1944 मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात मसुरी ( आत्तच्या उत्तराखंड ) येथे झाला. अनोखा अंदाज, उत्कृष्ट अभिनय, सुंदर हास्य, आणि नृत्यामध्ये निपूण असलेल्य सायरा बानो यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर बसवले. सायरा बानो यांनी साकारलेल्या आतापर्यंतच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना भावल्या.


वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी शम्मी कपूर यांच्यासोबत ‘जंगली’ सिनेमातून सायरा बानो यानी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. सायरा बानो यांनी 1961 ते 1988 पर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं.

‘झुक गया आसमान’, ‘आयी मिलान कि बेला’, ‘व्हिक्टोरिया नं. 203’, ‘पडोसन’, ‘जंगली’, ‘ये जिंदगी कितनी हसीन है’, ‘ब्लफ मास्टर’, ‘हेरा फेरी’ यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.

हिंदी सिनेसृष्टीचे ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या प्रेमाचे किस्से काही नवे नाहीत. वयाच्या 12 व्या वर्षी सायरा बानो, दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या. 1963 मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नाच्यावेळी सायरा यांचे वय अवघे 22 वर्ष होते तर दिलीप 44 वर्षांचे होते.

दिलीप कुमार यांनी 1980 मध्ये दुसरं लग्नसुद्धा केलं होतं. यावेळी सायरा बानो आई कधीच बनू शकत नसल्याची चर्चा होती. याच कारणामुळे दिलीप कुमार यांनी दुसरं लग्न केल्याचे बालले जात होते. या घटनेने सायरा बानो खूप खचल्या होत्या. पण हे लग्न काही फार काळ टिकू शकलं नाही. 1983 मध्ये त्यांचा तलाख झाला.

सायरा बानू आणि दिलीप कुमार यांना मुलं नाही आहे. 1972 मध्ये सायरा बानो पहिल्यांदा प्रेग्नेंट झाली होती. पण काही कारणास्तव आठव्या महिन्यात त्यांचा गर्भपात झाला. या घटनेनंतर सायरा बानो कधीच गर्भवती होऊ शकल्या नाही.