Hanuman Jayanti 2023: आज हनुमान जयंतीचे (Hanuman Jayanti 2023) औचित्य साधत 'आदिपुरुष' (Adipurush)  या चित्रपटातील अभिनेता देवदत्त नागेचा (Devdatta Nage) फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला. या चित्रपटात तो हनुमानाची भूमिका साकारणार आहे. देवदत्त नागेबरोबरच काही कलकारांनी देखील हनुमानाची भूमिका साकारली आहे. जाणून घेऊयात चित्रपट आणि मालिकांमध्ये हनुमानाची भूमिका साकारलेल्या कलकारांबद्दल...


दारा सिंह (Dara Singh)


1976 मध्ये रिलीज झालेल्या बजरंगबली या चित्रपटात अभिनेते दारा सिंह यांनी पहिल्यांदा हनुमानाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेमध्ये  दारा सिंह यांनी हनुमानाची भूमिका साकारली. तसेच दारा सिंह यांनी 1997 मध्ये आलेल्या लव-कुश या चित्रपटातही हनुमानाची भूमिका साकारली होती.  


विंदू दारा सिंह (Vindu Dara Singh) 


दारा सिंह यांचा मुलगा  विंदू दारा सिंह याने देखील  हनुमानाची भूमिका साकारली आहे. त्यानं 1995 मध्ये आलेल्या जय वीर हनुमान मालिकेत हनुमानाची भूमिका साकारली होती.


राज प्रेमी (Raj Premi)


1997 मध्ये डीडी मेट्रोवर जय हनुमान नावाची मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत होती. या मालिकेचा निर्माता आणि दिग्दर्शक संजय खान होता. जय हनुमान मालिकेमधील हनुमानाची भूमिका अभिनेता राज प्रेमीने साकारली होती आणि ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती.


दानिश अख्तर (Danish Akhtar)


अभिनेता दानिश अख्तरने 2015 मधील छोट्या पडद्यावरील सिया के राम या मालिकेत हनुमानाची भूमिका साकारली.   


भानुशाली इशांत (Bhanushali Ishant) आणि निर्भय वाधवा ( Nirbhay Wadhwa)


2015 मध्ये  संकट मोचन महाबली हनुमान नावाची मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत होती. या मालिकेत बाल हनुमानाची भूमिका भानुशाली इशांतने साकारली होती. तसेच या मालिकेत निर्भय वाधवाने देखील हनुमानाची भूमिका साकारली होती.


 एकग्रा द्विवेदी (Ekagra Dwivedi)


कहत हनुमान जय श्री राम (2020) या मालिकेमध्ये एकग्रा द्विवेदीनं हनुमानाची भूमिका साकारली. एकग्रानं वयाच्या 6 व्या वर्षी ही भूमिका साकारल्याने अनेकांनी त्याचे कौतुक केलं. 


देवदत्त नागे (Devdatta Nage)


'आदिपुरुष' या सिनेमात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे (Devdatta Nage) हनुमानाच्या भूमिकेत आहे. देवदत्तने या सिनेमाचं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे की,"श्रीराम के भक्त और रामकथा के प्राण... जय पवनपुत्र श्री हनुमान!"


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Adipurush : जय पवनपुत्र श्री हनुमान! 'आदिपुरुष' सिनेमातील हनुमानाचा फर्स्ट लुक आऊट; मराठमोळ्या देवदत्त नागेने वेधलं लक्ष