Aryan Khan: सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सचं (Star Kids) प्रमाण वाढताना दिसत आहे. अनेक स्टारकिड्स मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करत आहेत.  रणबीर कपूर, जान्हवी कपूर,सारा अली खान, या स्टारकिड्सनी बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. सध्या एका  स्टारकिडचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  या फोटोमध्ये हा स्टारकिड अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यासोबत दिसत आहे. व्हायरल फोटोमधील हा चिमुकला मुलगा कोण आहे? ते जाणून घेऊयात...


व्हायरल फोटोमध्ये जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यासोबत एक चिमुकला मुलगा दित आहे. हा फोटो कभी खुशी कभी गम (Kabhi Khushi Kabhie Gham) या चित्रपटातील आहे. व्हायरल फोटोमधील हा चिमुकला मुलगा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आहे.  कभी खुशी कभी गम  या चित्रपटात आर्यननं  बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या बालपणीची भूमिका साकारली होती. 






आर्यन लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी आर्यननं या नव्या प्रोजेक्टची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यानं क्लॅप बोर्ड आणि स्क्रिप्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टला त्यानं कॅप्शन दिलं, 'लिखाण झालं आहे, आता अॅक्शन म्हणायची वाट बघत आहे' आर्यनच्या या पोस्टला कमेंट्स करुन अनेकांनी त्याच्या आगमी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या. गौरी खान, रितेश देशमुख आणि शाहरुख खान यांनी आर्यनच्या या पोस्टला कमेंट केल्या. 






आर्यन खानला ऑक्टोबर 2021 मध्ये क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. नंतर त्याला क्लीनचिट मिळाली. या सर्व प्रकरणावर गौरी खाननं कॉफी विथ करण या शोमध्ये प्रतिक्रिया दिली होती.


शाहरुख लवकरच जवान आणि डंकी या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही महिन्यांपूर्वी शाहरुखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Aaryan Khan: आर्यन खानला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'पोलिसांनी एवढं धुतलं की...'