Akshay Kumar : बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. लैंगिक शिक्षणासारख्या गंभीर विषयावर सिनेमा बनवण्याचा तो विचार करत आहे. 'रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'च्या मंचावर त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. या सिनेमावर खिलाडी कुमारचं काम सुरू असून पुढील वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. 


मॉडरेटर कलीम आफताब यांच्यासोबत संवाद साधताना अक्षय म्हणाला,"लैंगिक शिक्षण हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. पण तरीदेखील या विषयाची दखल घेतली जात नाही. जगातील प्रत्येक शाळेत हा विषय शिकवला गेला पाहिजे असं मला वाटतं. पण मी माझ्यापद्धतीने हा विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त हा सिनेमा प्रदर्शित व्हायला थोडा वेळ लागेल. पण हा माझ्या आतापर्यंतच्या सिनेमांपैकी एक सर्वोत्कृ्ष्ट सिनेमा असेल". 






अक्षय पुढे म्हणाला,"सामाजिक विषयांवर सिनेमा करायला मला आवडतं. हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकत नसले तरी मनाला समाधान मिळतं". खिलाडी कुमारने याआधीदेखील 'टॉयलेट एक प्रेमकथा' आणि 'पॅडमॅन' सारखे सामाजिक संदेश देणारे सिनेमे केले आहेत. हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. 


आयुष्मान खुरानाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अॅन अॅक्शन हिरो' या सिनेमात अक्षय कुमारची झलक पाहायला मिळते आहे. तसेच त्याचे अनेक सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. अक्षया 'हेरा फेरी' मधून बाहेर पडल्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले होते. पण आता तो पुन्हा एका वेगळ्या विषयावर सिनेमा घेऊन येणार असल्याने चाहते आनंदी झाले आहेत. 


संबंधित बातम्या


Akshay Kumar: रितेश आणि जिनिलियाच्या 'वेड' चित्रपटासाठी अक्षय कुमारची खास पोस्ट; म्हणाला, 'माझा भाऊ...'