Ravrambha Marathi Movie: गेले अनेक दिवस सिनेमागृह बंद होती. पण आता सिनेमागृहे सुरू ठेवण्यास परवानगी मिळाल्यापासून बॉलिवूडसह मराठीतील अनेक बिग बजेट सिनेमांनी त्यांच्या सिने-प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मराठी सिनेमांचा आकडा अद्याप कमी आहे. पण लवकरच मराठी सिनेमांनादेखील यश मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. याच पाश्वभूमीवर मराठीतील बिग बजेट सिनेमांनी शूटिंगलादेखील सुरूवात केली आहे. लवकरच 'रावरंभा' या ऐतिहासिक सिनेमाचे शूटिंग सुरू होणार आहे.
मराठी सिनेविश्वातील गिरीश कुलकर्णी आणि ओम भूतकरचा 'रावरंभा' हा सिनेमा असणार आहे. गिरिश कुलकर्णी आणि ओम भूतकर पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमात ओम भूतकर 'राव' या भूमिकेत दिसून येणार आहे. तर अभिनेत्री मोनालिसा बागल 'रंभा'च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर गिरिश कुलकर्णी कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
Madhuri Dixit च्या मुलाने कॅन्सरग्रस्तांसाठी केले काम, माधुरीने व्हिडीओ शेअर करत केले मुलाचे कौतुक
इतिहासाच्या पानांमध्ये रावरंभा ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच "रावरंभा" या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येत आहे. गिरीश कुलकर्णी आणि ओम भूतकर यांनी या पूर्वी देऊळ, फास्टर फेणे अशा काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांनीही आपल्या कसदार अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मात्र रावरंभा हा या दोघांचाही पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे. त्यामुळे या दोन मातब्बर अभिनेत्यांना ऐतिहासिक चित्रपटात एकत्र पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
Chandigarh Kare Aashiqui: Ayushmann Khurrana, Vaani Kapoor च्या 'चंडीगड करे आशिकी' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
'रावरंभा' सिनेमाची निर्मिती शशिकांत पवार यांनी केली आहे. तर बेभान, झाला बोभाटा, भिरकीट असे उत्तम सिनेमे केलेले अनुप जगदाळे या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. तर या सिनेमाचे लेखन प्रताप गंगावणेने केले आहे. ऐतिहासिक चित्रपटांतील 'रावरंभा' सिनेमा हा वेगळा असणार आहे. रावरंभातून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगडण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सिनेमाची खासियत म्हणजे हा सिनेमा सातारा जिल्ह्यात चित्रित होणार आहे. डिसेंबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. तर लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.