Madhuri On National Cancer Day: मुलांनी एखादे चांगले काम केले तर त्याचा सगळ्यात जास्त आनंद पालकांना होत असतो. बॉलिवूडच्या धकधक गर्लने नुकताच तिच्या मुलाचा रेयानचा (Ryan) व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा मुलगा रायन कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी केस दान करताना दिसून येत आहे. त्यामुळे माधुरीने व्हिडीओ शेअर करत मुलाला हीरो म्हटले आहे.
माधुरीने व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे, सगळे हीरो टोपी घालत नाहीत. पण माझा मुलगा टोपी घालतो. राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त मी एक खास गोष्ट शेअर करत आहे.
मुलाचे कौतुक करत माधुरीने पुढे लिहिले आहे,"रेयानचे काही मित्र कॅन्सर आणि केमोथेरपीचा लढा देत होते. त्यांच्या दु:खात सहभागी होत माझ्या मुलाने चाईल्ड कॅन्सर सोसायटीला केस दान करण्याचा निर्णय घेतला आहे. पालक म्हणून मला माझ्या मुलाच्या निर्णयाचा अभिमान आहे".
हा व्हिडीओ शेअर करत माधुरीने खुलासा केला आहे की, रेयानने कॅन्सरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून केस कापले नाहीत. माधुरीने लिहिले,"रेयानला तेवढे केस वाढवून कापायला दोन वर्षांचा कालावधी पार करावा लागला. त्यामुळे आज आम्हाला खूप अभिमान वाटत आहे". या व्हिडीओमध्ये माधुरीने तिच्या पतीदेखील टॅग केले आहे.
Chandigarh Kare Aashiqui: Ayushmann Khurrana, Vaani Kapoor च्या 'चंडीगड करे आशिकी' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
माधुरीने शेअर केलेल्या या व्हिडीओचे प्रचंड कौतुक होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस पडतो आहे. माधुरी आणि श्रीरामला रेयान आणि अरीन अशी दोन मुले आहेत. अरीन सध्या कॅलिफॉर्निया विद्यापीठात शिक्षण घेत आहे.