बायकोचं हटके बर्थ डे गिफ्ट, रितेश देशमुख म्हणतो...
एबीपी माझा वेब टीम | 19 Dec 2017 12:31 PM (IST)
रितेश आणि जेनेलिया यांना बॉलिवूडमधलं क्यूट कपल म्हटलं जातं. नऊ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये दोघांनी लग्न केलं. रितेश आणि जेनेलियाला 2 मुलं आहेत.
मुंबई : मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 17 डिसेंबरला त्याचा 40 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाला पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझाने अतिशय महागडं गिफ्ट दिलं. रितेशने ह्या गिफ्टचा फोटो ट्विटरवर शेअर करुन याची माहिती दिली. जेनेलियाने रितेशला नुकतीच भारतात लॉन्च झालेली टेस्ला एक्स ही महागडी कार वाढदिवसाला गिफ्ट दिली आहे. 40 वर्षांच्या बर्थ डे बॉयला 20 वर्षांचा असल्याप्रमाणे कसं जाणवून द्यायचं हे बायकोला नेमकं माहित आहे, असं ट्वीट रितेश देशमुखने केलं आहे. रितेश आणि जेनेलिया यांना बॉलिवूडमधलं क्यूट कपल म्हटलं जातं. नऊ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये दोघांनी लग्न केलं. रितेश आणि जेनेलियाला 2 मुलं आहेत. या कारची भारतातील किंमत सुमारे 68 लाख रुपयांच्या घरात आहे. टेस्लाची ही गाडी पूर्णपणे वीजेवर चालणारी आहे. पाच दरवाजे आणि अत्याधुनिक सुविधा असलेली ही गाडी 135 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने सुसाट धावते. साधरणत: एर कोटींहून अधिक किंमतीच्या इम्पोर्टेड गाड्यांवर 20 लाखांपर्यंतचा कर आकारला जातो. मात्र टेस्ला ही पूर्णपणे विजेवर चालणारी कार असल्याने आरटीओच्या करांमधून सूट मिळाल्याचे कळतं. संबंधित बातम्या देशातील पहिल्या 'टेस्ला' कारची मुंबईकराकडून नोंदणी पेट्रोल-डिझेल नव्हे, आता पूर्णपणे विजेवर चालणारी कार