मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जेनेलियाने सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख प्रीती झिंटा सोबत हसत-हसत बोलत तिला किस करताना दिसून येतो. यावेळी जेनेलियाही त्यांच्या बाजूला असते आणि तिच्या चेहऱ्यावरचा बदललेला रंग पाहण्यासारखा आहे.
बॉलिवूडचे सगळ्यात क्यूट कपल जेनेलिया डिसूजा आणि रितेश देसमुख आहे. दोघेही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असतात. त्यामुळे त्यांनी टाकलेले फोटो, व्हिडीओ लगेच व्हायरल होतात. त्यांनी शेअर केलेल्या फोटोला, व्हिडीओला त्यांचे फॅन्स चांगला प्रतिसाद देत असतात. जेनेलिया आणि रितेशचा एक व्हिडीओ सध्या खूपच चर्चेत आहे.
या व्हिडीओमध्ये अभिनेत्री प्रीती झिंटादेखील आहे. जेनेलियाने हा व्हिडीओ विनोदी अंगाने बनवला होता. यात तिला प्रिती जिंटाचा राग देखील आलेला दिसून येत आहे. खरतर हा व्हिडीओ दोन वेगळ्या क्लिप एकत्र करून बनविण्यात आला आहे. पहिली क्लिप एका पुरस्कार सोहळ्यातली आहे. या सोहळ्यात प्रीति जिंटा आलेली आहे. तसेच रितेश देशमुख जेलेलियासोबत आहे. प्रीति जिंटा रितेश दिसताच त्याला मिठी मारते आणि त्याला औपचारिक किस करते.
त्यानंतर प्रीति रितेशसोबत हसत-हसत बोलते. यादरम्यान जेनेलिया त्यांच्या बाजूला उभी आहे. त्यांना बघून तिच्या चेहऱ्यावर खोटं हसू देखील आहे. तिला प्रीतिचा प्रचंड राग आलेला आहे. त्यामुळे ती सारखी प्रीतीकडे बघत आहे.
हा बघा जेनेलियाचा व्हायरल व्हिडीओ

For the love of the viral video.. 💚💚💚 & of course @Riteishd & the cutest ting ting @realpreityzinta pic.twitter.com/wCsPhDMPcq
— Genelia Deshmukh (@geneliad) March 19, 2021

रितेशला मारहानत्यानंतर दुसरी व्हिडीओ सुरू होते. त्यात जेनेलिया खूपच रागात आहे आणि पंच मारत आहे. त्यानंतर रितेश देशमुख जेनेलियाचा मार खाताना दिसून येतो. मग रितेश हात जोडतो आणि खाली पडतो. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला 'रामलखन' चित्रपटातील 'तेरा नाम लिया तुझे याद किया' हे गाणं सुरू आहे.
प्रीति जिंटाला म्हणाली क्यूटहा फनी व्हिडीओ शेअर करत जेनेलियाने प्रीति जिंटाला क्यूट असं म्हटलं आहे. तसेच जेनेलियाने प्रीति जिंटाला टॅगदेखील केले आहे. या व्हिडीओला त्यांचे चाहते चांगलाच प्रतिसाद देत आहेत.