Amitabh Bachchan in World Cup 2023 : विश्वचषक 2023 मध्ये (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाने भारतावर (IND Vs AUS) विजय मिळवला. भारताला अंतिम सामन्यात मोठा धक्का बसला. भारतीयांची मनं दुखावली गेली. वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.


भारताच्या पराभवानंतर अमिताभ बच्चन ट्रोल (Amitabh Bachchan Troll)


अमिताभ बच्चन क्रिकेटचे मोठे चाहते असून त्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान ट्वीट केलं होतं की,"कुछ भी तो नहीं". या ट्वीट नंतर क्रिकेटप्रेमींनी बिग बींना ट्रोल करायला सुरुवात केली. सर्वात आधी तुम्ही टीव्ही पाहणं थांबवा सर, तुम्ही जेव्हा मॅच पाहता तेव्हा टीम इंडियाचा पराभव होतो असं तुम्हीच सांगितलं होतं, वर्ल्ड कपचा सामना पाहायला नको होतात. भारताचा पराभव झालाय आणि तुम्ही काहीच नाही असं फक्त म्हणताय, तर कृपया आता काहीच बोलू नका, तुम्ही सामना पाहणार नाही, अशी आम्हाला आशा होती", अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांना चांगलच ट्रोल केलं आहे.






अमिताभ बच्चन विश्वचषकाचा सामना पाहिल्यामुळे भारताचा पराभव झाला असं काही नेटकरी म्हणत आहेत. काही दिवसांपूर्वी बिग बी यांनी एक ट्वीट शेअर केलं होतं,"जावं की नको याचा विचार करतोय". त्यांच्या या ट्वीटनंतर नेटऱ्यांनी वर्ल्ड कपचा सामना पाहायला जाऊ नका अशी त्यांना विनंती केली". 






अमिताभ बच्चन एक ट्वीट शेअर करत म्हणाले होते,"मी सामना नाही पाहिला तर आपण जिंकतो". आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना अमिताभ बच्चन यांनी पाहिला आहे. त्यामुळे त्यांना नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं आहे. फक्त एक सामना पाहायचा नव्हता, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.






अमिताभ बच्चन यांचा टीम इंडियाला सपोर्ट


भारताच्या पराभवानंतर अमिताभ बच्चन यांनी टीम इंडियाला सपोर्ट केला आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे की,"साहसी प्रयत्नानंतर एक असा पराभव...निळ्या कपड्यातील सर्वच पुरुषांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे".


अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना प्रतीक्षा


अमिताभ बच्चन यांची क्रेझ चाहत्यांमध्ये आजही कायम आहे. त्यांचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले आहेत. आता कल्कि 2898 AD ,गणपत,सेक्शन 84 आणि  तेरा यार हूँ मैं या त्यांच्या सिनेमांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.