Gauhar Khan Pregnancy : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री गौहर खानने (Gauhar Khan) चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. गौहर वयाच्या 39 व्या वर्षी आई होणार आहे. 


'बिग बॉस 7'ची (Bigg Boss) विजेती गौहर खान 25 डिसेंबर 2020 रोजी झैद दरबारसोबत (Zaid Darbar) लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर लगेच तीन महिन्यात गौहर प्रेग्नंट असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे गौहर खूप भडकली होती. येत्या 25 डिसेंबरला गौहरच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे. 


गौहरने एका वेगळ्या पद्धतीने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. तिने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. कार्टूनचा मजेशीर व्हिडीओ शेअर करत तिने म्हटलं आहे, 'गौहर झैद आणि + 1'. या व्हिडीओला तिने कॅप्शन लिहिलं आहे, "आनंददायी प्रवासाची सुरुवात करताना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे". 






गौहर खानने शेअर केलेल्या पोस्टवर शाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सध्या गौहर छोट्या पडद्यासह ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील धुमाकूळ घालत आहे. आजवर तिने अनेक वेबसीरिजच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. 


गेल्या काही दिवसांपूर्वी नेहा कक्कड आणि रोहनप्रीतच्या 'बारिश में तुम' या गाण्यातील गौहर खान आणि झैदची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. आजवर छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमांत गौहर दिसली आहे. सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस 7' (Bigg Boss 7) या लोकप्रिय कार्यक्रमाची गौहर विजेती ठरली होती. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट आयटम सॉंग केले आहे.


संबंधित बातम्या


गौहर खानचा 11 वर्षे लहान झैद दरबारसोबत साखरपुडा, वडील इस्माईल दरबार म्हणतात...