Gashmeer Mahajani:  अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नेहमी देत असतो. नुकतेच गश्मीरनं अस्क गश हे सेशन केलं. या सेशनमध्ये गश्मीरला चाहत्यांनी विविध विषयांवर आधारित असणारे प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना  गश्मीरनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.

एका नेटकऱ्यानं गश्मीरला प्रश्न विचारला की, 'सध्यस्थितीला महाराष्ट्रात चाललेल्या राजकारणावर तुमचं मत काय आहे? मान्य आहे तुमचं क्षेत्र नाही, पण तरीही...' या प्रश्नाचं गश्मीरनं उत्तर दिलं, जे अजूनतरी माझं क्षेत्र नाही आणि ज्यातले आत्ता तरी मला सखोल ज्ञान नाही. त्यावर मी भाष्य करु इच्छित नाही.'

 

'कसा आहेस भावा? माझ्या वडिलांचा खूप फेवरेट आहेस तू, ते विचारत आहेत, तू कधी त्या केजीएफच्या यश सारखी फिल्म करणार?' असा प्रश्न गश्मीरला एका चाहत्यानं विचारला. फॅनच्या या प्रश्नाला गश्मीरनं उत्तर दिलं, 'त्यांच्या आशीर्वादाने नक्की करणार. थोडी कळ सोसा कारण करण्याआधी फार बोलणे योग्य नाही.'

एका युझरनं गश्मीरला त्याच्या नावाबद्दल विचारलं. त्या युझरनं प्रश्न विचारला, 'गश्मीर हे नाव खूप अनोखं आहे. कोणी ठेवले? बाबा की आजी आजोबा?' गश्मीरनं चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर दिलं, 'गुरुजींनी ठेवले.'

गश्मीर (Gashmeer Mahajani) लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं  सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं,"पुन्हा एकदा तोच प्रवास...लवकरच.." गश्मीरच्या या नव्या प्रोजेक्टची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. गश्मीरनं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

गश्मीरचे चित्रपट

गश्मीरनं सरसेनापती हंबीरराव,देऊळ बंद, कान्हा, विशू, वन वे तिकीट, बोनस आणि  कॅरी ऑन मराठा या चित्रपटांमध्ये काम केलं. तेरे इश्क में घायल, इमली या हिंदी मालिकांमध्ये देखील गश्मीरनं काम केलं.  गश्मीर हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. आता त्याच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Gashmeer Mahajani : वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीचं कमबॅक! पुन्हा दिसणार ऐतिहासिक भूमिकेत