Sunny Deol Gadar 2 Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांच्या 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमाने इतिहास रचला आहे. 2001 मध्ये आलेल्या 'गदर एक प्रेम कथा' (Gadar : Ek Prem Katha) या सिनेमाचा दुसरा भाग आता 22 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमालाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता सनी देओल शाहरुखला (Shah Rukh Khan) टक्कर देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
'गदर 2' हा सिनेमा तिकीटबारीवर धुमाकूळ घालत आहे. दिवसेंदिवस नव-नवे रेकॉर्ड आपल्या नावे करत आहे. आता हा सिनेमा प्रदर्शित होऊन 24 दिवस पूर्ण झाले असून आजही या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. प्रेक्षक पुन्हा-पुन्हा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहत आहेत.
'गदर 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.. (Gadar 2 Box Office Collection)
'गदर 2' हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'गदर 2' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 284.63 कोटींची कमाई केली आहे. दुसरा आठवडा 134.47 कोटी, तिसरा आठवडा 63.35 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या 24 दिवसांत सिनेमाने 501.87 कोटींचा गल्ला जमवला आहे.
शाहरुखला टक्कर देणार सनी देओल?
500 कोटींचा टप्पा पार करणारा 'गदर 2' हा तिसरा बॉलिवूडपट ठरला आहे. एसएस. राजामौलींचा 'बाहुबली 2' हा सिनेमा 2017 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने 510 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 'पठाण' या सिनेमाने 1,050 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे सनी देओलचा 'गदर 2' हा सिनेमा बॉलिवूडचा बादशाह असणाऱ्या शाहरुख खानला टक्कर देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
'गदर 2' हा सिनेमा रिलीजच्या चौथ्या आठवड्यात 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित या सिनेमात सनी देओल (Sunny Deol), अमीषा पटेल (Ameesha Patel) आणि उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमातील तारा सिंह आणि सकीनाच्या जोडीवर प्रेक्षक प्रेम करत आहेत. सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
संबंधित बातम्या