Gadar 2 Jailer OMG 2 Box Office Collection : बॉलिवूडसाठी (Bollywood) एक आनंदाची बातमी आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा  (Rajinikanth) 'जेलर' (Jailer), बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) अभिनीत 'गदर 2' (Gadar 2) तसेच अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांचा 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. दरम्यान अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) 'घूमर' (Ghoomer) हा सिनेमाही प्रदर्शित झाला आहे. 


रजनीकांतच्या 'जेलर'चा जगभरात बोलबाला (Jailer Box Office Collection)


दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा (Rajinikanth) 'जेलर' (Jailer) या सिनेमाचा जगभरात बोलबाला आहे. भारतीय सिनेरसिकांच्या पसंतीस उतरलेला हा सिनेमा जगभरात चांगलीच कमाई केली आहे. भारतात रिलीजच्या नऊ दिवसांत या सिनेमाने 244.85 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने तब्बल 426.7 कोटींचा गल्ला जमवला आहे. 


रजनीकांतवर भारी पडलाय सनी देओल; 'गदर 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Gadar 2 Box Office Collection)


सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा दिवसेंदिवस कमाईचे नव-नवे उच्चांक गाठत आहे. मोठ्या वीकेंडचा या सिनेमाला चांगलाच फायदा झाला आहे. तसेच स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर हा सिनेमा रिलीज करण्यात आल्याने हा सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे आतापर्यंत भारतात या सिनेमाने 304.13 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे भारतीय बॉक्स ऑफिसवर 'गदर 2' या सिनेमाने रजनीकांत यांच्या 'जेलर' सिनेमापेक्षा जास्त कमाई केली आहे. 


'ओएमजी 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (OMG 2 Box Office Collection)


बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांचा 'ओएमजी 2' (OMG 2) हा सिनेमाही चांगली कमाई करत आहे. लैंगिक शिक्षणावर भाष्य करणाऱ्या या सिनेमाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. कलाकारांनी आपली भूमिका चोख निभावली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 90.65 कोटींची कमाई केली असून लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करेल.


अभिषेक बच्चनच्या 'घूमर'ची काय स्थिती आहे? (Ghoomer Box Office Collection)


अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) यांचा 'घूमर' (Ghoomer) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 0.85 कोटींची कमाई केली आहे. 'घूमर'चं ओपनिंग डे कलेक्शन खूपच निराशाजनक आहे. आता एकीकडे 'गदर 2' आणि 'ओएमजी 2'सारखे सिनेमे शर्यतीत असताना 'घूमर' किती कोटींची कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


संबंधित बातम्या


Box Office Collection : मायबाप प्रेक्षकांचे प्रेम पाहून रजनीकांत, सनी देओल भारावले; 'Gadar 2' अन् 'Jailer'ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई!