FTII Recruitment 2023 : फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) पुणे येथे शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी एफटीआयआयमधून शिक्षण घेतले आहे. आता या एफटीआयआयमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला ही संधी उपलब्ध झाली आहे. एफटीआयआयमध्ये गट ब आणि क या श्रेणीच्या पदांसाठी नोकऱ्या उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. 


'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' मधील (Film and Television Institute of India) भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 29 एप्रिलपासून सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, FTII मध्ये गट B आणि गट C श्रेणी पदांसाठी एकूण 84 रिक्त जागा आहेत. रिपोर्टनुसार, जे उमेदवार भारतीय नागरिक आहेत आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने पात्र घोषित केले आहेत तीच मंडळी एफटीआयआयमध्ये भरतीसाठी अर्ज करू शकतात. 






फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार गट ब आणि क श्रेणीच्या पदांसाठी अर्ज करू शकत नाहीत.


एफटीआयआयमध्ये अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? 


पुण्यातील एफटीआयआयमध्ये अर्ज करण्यासाठी गट ब आणि क श्रेणीच्या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. अधिक तपशील जाणून घेण्यासाठी FTIIच्या संकेतस्थळाला भेट द्या. 


निवड कशी होईल? 


एफटीआयआयमधील गट ब आणि क पदांसाठीची भरती लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीद्वारे करण्यात येणार आहे. 


सिनेमा पाहायला अनेकांना आवडते. तर काही मंडळी सिनेसृष्टीत करिअर करण्याचं स्वप्नही पाहतात. पुण्यातील 'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' अशा अनेक मंडळींची स्वप्ने साकार करण्याचे काम करत आहे.


फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था अभिनयाचे प्रशिक्षण देण्यासाठी लोकप्रिय आहे. मात्र, इथे सिनेमाचा अविभाज्य भाग असणाऱ्या दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, स्क्रिप्ट रायटिंग अशा बाबींचेही प्रशिक्षण दिले जाते. शिवाय साउंड रेकॉर्डिंग, कलादिग्दर्शन, अ‍ॅनिमेशन आणि ग्राफिक्स यांचेही अभ्यासक्रम येथे शिकविले जातात. याशिवाय संस्थेमार्फत अनेक छोटे अभ्यासक्रमही चालवले जातात.


संबंधित बातम्या


Pune FTII Suicide: पुण्यात FTII मध्ये गळफास घेत विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य; आत्महत्येचं कारण अस्पष्ट