Political Films : मनोरंजनसृष्टीत राजकारणावर आधारित अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. नुकताच 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा प्रदर्शित झाला असून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. हा सिनेमादेखील निवडणुकीदरम्यान प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत अनेक राजकीय सिनेमे निवडणुकी दरम्यान प्रदर्शित झाले आहेत. 


उरी : द सर्जिकल स्ट्राइक : विकी कौशलचा 'उरी' हा सिनेमा 11 जानेवारी 2019 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. हा सिनेमादेखील एप्रिल-मे 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीपूर्वी प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली होती. 


द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर : 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' हा सिनेमादेखील 11 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भूमिका अनुपम खेर यांनी साकारली होती. हा सिनेमा संजय बारू यांच्या 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या कादंबरीवर आधारित होता. बॉक्स ऑफिसवर मात्र या सिनेमाला चांगली कमाई करता आली नाही. 


पीएम नरेंद्र मोदी : 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 24 मे ला 'पीएम नरेंद्र मोदी' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. विवेक ओबेरॉय या सिनेमात मोदींच्या भूमिकेत दिसला होता. आचारसंहितेमुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. 


ठाकरे : अभिजीत पानसे दिग्दर्शित 'ठाकरे' सिनेमात नवाजुद्दीन मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा सिनेमा वादात सापडला होता. 23 जानेवारी 2019 रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. 


यात्रा : 'यात्रा' हा सिनेमा 2004 ते 2009 या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या वायएस राजशेखर रेड्डी यांच्या पदयात्रेवर आधारित आहे. हा सिनेमा 8 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित झाला होता. 


संबंधित बातम्या


The Kashmir Files Box Office Collection Day 5 : बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत काश्मीर फाईल्सची बॉक्स ऑफिसवर जादू कायम;  पाचव्या दिवसाची कमाई माहितीये?


Ms Marvel Trailer : कमला खानवर आधारित ‘मिस मार्वल’चा ट्रेलर रिलीज! ‘या’ दिवशी सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार


Heropanti 2 : ‘बबलू’ बनून टायगर श्रॉफ दाखवणार हीरोपंती! ‘या’ दिवशी रिलीज होणार धमाकेदार ट्रेलर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha