OTT Release This Week : ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात अनेक चांगले सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. यात प्रेक्षकांना अॅक्शन, रोमान्ससह थरार नाट्य पाहायला मिळणार आहे. कुमारी श्रीमती (Kumari Srimati), 'किंग ऑफ कोठा' (King of Kotha), चूना अशा अनेक सिनेमांचा आणि वेबसीरिजचा समावेश आहे. एकंदरीतच या आठवड्यात ओटीटीवर दाक्षिणात्य कलाकृतींचा बोलबाला आहे.
हॉस्टल डेज सीझन 4 कुठे पाहू शकता? अॅमेझॉन प्राइम व्हिडीओकधी पाहता येईल? 27 सप्टेंबर
'हॉस्टल डेज सीझन 4' ही सीरिज प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. 27 सप्टेंबरला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'हॉस्टल डेज'चे तिन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्यामुळे प्रेक्षक आता या सीरिजचा पुढचा भाग पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
चार्ली चोप्रा और द मिस्ट्री ऑफ सोलंग वैलीकुठे पाहू शकता? सोनी लिव्हकधी पाहता येईल? 27 सप्टेंबर
'चार्ली चोप्रा और द मिस्ट्री ऑफ सोलंग वैली' ही सीरिज सोनी लिव्हवर प्रेक्षक पाहू शकतात. लोकप्रिय कथाकार अगाथा क्रिस्टी यांच्या 'The Sittaford Mystery' या कादंबरीवर ही सीरिज बेतलेली आहे. या सीरिजमध्ये नसीरुद्दीन शाह, गुलशन ग्रोवर, पाउली दाम, रत्ना शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
कुमारी श्रीमतीकुठे पाहू शकता? अॅमेझॉन प्राइम व्हिडीओकधी पाहता येईल? 28 सप्टेंबर
'कुमारी श्रीमती' ही नित्या मेनन यांची तेलगू सीरिज आहे. 28 सप्टेंबरला हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. एका मुलीच्या आयुष्यावर भाष्य करणारी ही सीरिज आहे.
किंग ऑफ कोठाकुठे पाहू शकता? डिज्नी प्लस हॉटस्टारकधी पाहता येईल? 28 सप्टेंबर
दुलकर सलमानचा 'किंग ऑफ कोठा' हा सिनेमा 28 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिलेर नावाच्या एका पोलिस अधिकाऱ्याची आणि गँगस्टारची गोष्ट या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बॉक्स ऑफिसवर जादू न दाखवू शकलेला हा सिनेमा ओटीटीवर धमाका करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एजेंट कुठे पाहू शकता? सोनी लिव्हकधी पाहता येईल? 29 सप्टेंबर
'एजेंट' हा सिनेमा आजपासून (29 सप्टेंबर) प्रेक्षक सोनी लिव्हवर पाहू शकतात. या सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्य पाहायला मिळणार आहे.
चूना कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्सकधी पाहता येईल? 29 सप्टेंबर
'चूना' ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
जन वीकुठे पाहू शकता? प्राइम व्हिडीओकधी पाहता येईल? 29 सप्टेंबर
'जन वी' ही सीरिज प्रेक्षक 29 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे,
तुमचे ना हो पाएगाकुठे पाहू शकता? डिज्नी प्लस हॉटस्टारकधी पाहता येईल? 29 सप्टेंबर
'तुमसे ना हो पाएगा' ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक पाहू शकतात. या सीरिजमध्ये इश्वाक सिंह, महिमा मकवाना, गौरव पांडे, गुरप्रीत सैनी आणि करण जोतपानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. एका तरुण मुलाची गोष्ट या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या