Freddy Teaser Out: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. कार्तिकच्या फ्रेडी (Freddy) या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्तिक हा हटके भूमिका साकारत आहे. टीझरमधील कार्तिकच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


फ्रेडी हा चित्रपट थ्रिलर आणि अॅक्शन कथानकावर आधारित आहे. कार्तिकसोबतच या चित्रपटात अभिनेत्री आलाया.एफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. कार्तिक हा या चित्रपटात एका डेंटिस्टच्या भूमिका साकारणार आहे. टीझरसोबतच चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील घोषणा करण्यात आली आहे. फ्रेडी हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 2 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 


फ्रेडी चित्रपटाचा टीझर कार्तिकनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला कार्तिकनं कॅप्शन दिलं, 'फ्रेडीच्या जगात तुमचे स्वागत,  2 डिसेंबर 2022 रोजी अपॉइंटमेंट्स सुरू आहेत.'


पाहा टीझर 






चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष यांनी केलं असून निर्मिती ही बालाजी टेलिफिल्म्सनं आणि  नॉर्दर्न लाइट्स फिल्म्स यांनी केली आहे.  कार्तिकच्या या चित्रपटाची आता प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. कार्तिकच्या भूल भूलैय्या-2 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  कार्तिकच्या 'भूल भुलैया 2' या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 50 दिवस पूर्ण केले. जगभरात या सिनेमाने  230 कोटींचा गल्ला जमवला. या सिनेमानंतर कार्तिकचा 'फ्रेडी', 'शहजादा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


कार्तिक आणि कियारा यांचा 'सत्यप्रेम की कथा' 'या' दिवशी होणार प्रदर्शित; मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस करणार दिग्दर्शन!