Maanvi Gagroo Kumar Varun Wedding: सध्या मनोरंजनक्षेत्रात वेडिंग सिझन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Sidharth Malhotra) यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय यांनी देखील लग्नगाठ बांधली. आता प्रसिद्ध अभिनेत्री मानवी गागरू (Maanvi Gagroo) आणि स्टँड-अप कॉमेडियन कुमार वरुण (Kumar Varun) यांनी लग्नगाठ बांधली आहे. जवळचे मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत मानवी आणि कुमार यांचा लग्न सोहळा पार पडला.


मानवी आणि कुमार वरुणनं शेअर केले खास फोटो 


मानवी आणि कुमार वरुणनं आज (23 फेब्रुवारी) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या लग्नाची माहिती दिली. या फोटोमध्ये मानवी ही रेड कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे तर कुमार हा व्हाईट कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'तुम्ही आमच्या वैयक्तिक प्रवासात आम्हाला प्रेम आणि पाठिंबा दिला आहे, कृपया आमच्या प्रवासात आम्हाला आशीर्वाद देत राहा.' मानवी आणि कुमार वरुण यांनी शेअर केलेल्या फोटोला अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. 


सेलिब्रिटींच्या कमेंट्स


हिना खान, विक्रांत मेस्सी, जितेंद्र कुमार, सयानी गुप्ता, कुब्रा सैत, सृती झा यांनी मानवी आणि कुमार वरुण या सेलिब्रिटींनी मानवी आणि कुमार वरुण यांच्या फोटोला कमेंट्स करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. 






मानवी गगरू-कुमार वरुण  यांचे प्रोजेक्ट्स


पिचर्स, ट्रिपलिंग्स आणि 'फोर मोर शॉट्स प्लीज' या वेब सीरिजमध्ये मानवीनं काम केलं. 'फोर मोर शॉट्स प्लीज' वेब सीरिजमुळे मानवीला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच तिनं  ‘पीके’, ‘उजडा चमन’ आणि ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली. तर कुमार वरुण हा प्रसिद्ध कॉमेडियन आणि क्विज मास्टर आहे.  ‘लाखों में एक’  आणि ‘चाचा विधायक हैं हमारे’ या शोमध्ये त्यांनी काम केलं आहे. आता मानवी आणि कुमार लग्नानंतर ग्रँड पार्टीचे आयोजन करणार आहेत, असंही म्हटलं जात आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Mrs Chatterjee Vs Norway Trailer: 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' चा ट्रेलर रिलीज; मुलांसाठी लढा देणाऱ्या महिलेची गोष्ट, राणीच्या अभिनयाचं होतंय कौतुक