Alia Bhatt Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) 14 एप्रिल 2022 रोजी अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) लग्नबंधनात अडकली. आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली नसली तरी त्यांनी आलिया-रणबीरसाठी खास महागड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत.
रणबीरच्या आई नीतू कपूर यांनी आलिया-रणबीरला भेट म्हणून 26 कोटींचा 6BHK फ्लॅट दिला आहे. रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफने आलिया भट्टला प्लॅटिनम ब्रेसलेट भेट म्हणून दिले आहे. याची किंमत 14.5 लाख रुपये आहे. प्रियंका चोप्राने आलियाला हिऱ्याचा नेकलेस भेट दिला आहे. हा नेकलेस नऊ लाख किंमतीचा आहे.
दीपिका पदुकोण आलिया आणि रणबीरची चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे तिने भेट म्हणून त्यांना घळ्याळांचा सेट दिला आहे. या घड्याळांची किंमत 15 लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे. सिद्धार्थ मल्होत्राने आलियाला भेट म्हणून तीन लाख किंमतीची हॅंडबॅग दिली आहे.
संबंधित बातम्या