Indian Idol Marathi : 'इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सध्या घराघरांत 'इंडियन आयडल मराठी'च्या महाअंतिम सोहळ्याची चर्चा सुरू झाली आहे. 'इंडियन आयडल मराठी'च्या पहिल्या सीजनचा विनर कोण होणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. कोण जिंकणार मानाची ट्रॉफी हे काही तासातच प्रेक्षकांना समजणार आहे. 


कोण गाठणार चुरशीच्या स्पर्धेचं शिखर आणि कोण होणार 'इंडियन आयडल मराठी'च्या पहिल्या सीजनचा विनर? हे लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. सध्या 'इंडियन आयडल मराठी'चा महाअंतिम सोहळा दिमाखात पार पडताना दिसत आहे.





'हे' आहेत टॉप पाच स्पर्धक 


जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे.  'इंडियन आयडॉल मराठी'च्या पहिल्या सीजनचे टॉप पाच स्पर्धक कोण असणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. आता या टॉप पाच स्पर्धकांची यादी जाहीर झाली आहे.


संबंधित बातम्या


Rohit Shetty : रोहित शेट्टीचे ओटीटीवर पदार्पण, 'Indian Police Force' वेब सीरिजची केली घोषणा


Gangubai Kathiawadi OTT Release Date : 'गंगूबाई काठियावाडी' पाहता येणार नेटफ्लिक्सवर; 'या' दिवशी होणार रिलीज


Netflix : नेटफ्लिक्सला मोठा झटका; 100 दिवसांत लाखोंनी सब्सक्रायबर्स घटले, कंपनीनं सांगितलं 'हे' कारण